Manoj Jarange | आज (27 जानेवारी) मध्यरात्री राज्य सरकारने तीन तास चर्चा करून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. जरांगे (Manoj Jarange) यांनी केलेल्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून शासनाने त्या मान्य केल्या आहेत.जरांगे पाटील आज मुंबईला जाणार होते, त्यापूर्वी त्यांनी सरकारला एक दिवसाचा अवधी दिला होता.
यावर सरकारने लगेच पाऊल उचलत त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन आपले उपोषण सोडले आहे. यावेळी मुख्यमंत्री यांच्यासोबत गिरीश महाजन, दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते. यावेळी जरांगे यांनी शिंदे साहेब, आज उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, असं मोठं वक्तव्य केलं.
“शिंदे साहेब, आज उधळलेल्या गुलालाचा अपमान..”
मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना ज्युस पाजून त्यांचं उपोषण सोडलं. यावेळी वाशी येथे जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच सभा घेत मोठे वक्तव्य केलं. आम्ही मुंबईकडे निघत असतानाच सांगितलं होतं, तिकडं जाऊन काही होणार नाही. ही पोरं तिकडं जाऊन राडा करतील. मात्र, आम्ही आरक्षण घेणारच याच भूमिकेने तिकडं निघालो होतो. 29 ऑगस्टलाच म्हटलं होतं की, आरक्षणात मारलेल्या खुट्ट्या आम्ही उपटून फेकणार, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं आहे.
#LIVE | वाशी (नवी मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट व चर्चा https://t.co/FxhTLFfVue
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 27, 2024
मराठ्यांच्या नादी लागायचं नाय. आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाईलाज आहे. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद होऊ दिला नाही. पुढेही होऊ देणार नाही. आम्ही सर्व लहान-मोठे भाऊ म्हणून गुण्यागोविंदाने राहतो आहे, असंही जरांगे यांनी म्हटलंय.
“…पर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार मिळतील”
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनीही सभेत आपली प्रतिक्रिया दिली. एक मराठा लाख मराठा’ आमच्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही मराठ्यांनी संयमीपणे या ठिकाणी आंदोलन केलं. राज्य सरकारने तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा समाजासाठी असलेल्या सर्व महामंडळांना न्याय देण्याचं काम राज्य सरकार करेल. हे सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करेल, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी जरांगे (Manoj Jarange) यांना दिला.
आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार आणि ओबीसींच्या सर्व सवलती दिल्या जातील अशी सर्वांत मोठी घोषणाही एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मराठा समाजाच्या या लढ्याला मोठं यश मिळाल्यानंतर राज्यभरात जल्लोष करण्यात येत आहे.
News Title- Manoj Jarange big statement after the reservation ordinance
महत्वाच्या बातम्या-
Padma Award 2024 for Sports | क्रीडा विश्वातील ‘या’ सात शिलेदारांचा होणार सर्वोच्च सन्मान
Manoj Jarange Patil | सगेसोयरे म्हणजे नेमके कोण?, जाणून घ्या मनोज जरांगेंची नेमकी मागणी काय?
Abhishek Bachchan | घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनची पोस्ट, म्हणाला..
Padma awards 2024 | चित्रपटसृष्टीतील ‘या’ कलाकारांचा सर्वोच्च सन्मान; पाहा यादी