“जगलोच तर ॲब्यूलन्समध्ये जाईन पण…”; मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य

Manoj Jarange | मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या राज्यात शांतता रॅली करत आहेत. त्यांनी सरकारला 13 जुलैची मुदत दिली होती. ही मुदत आता संपली आहे. सगेसोयऱ्यासह सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्यासाठी त्यांनी ही मुदत (Manoj Jarange) दिली होती.

13 तारखेला ही मुदत संपली असून आता 20 तारखेपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. या मागणीसाठी आता ते पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आमरण उपोषण आणि शांतता रॅलीत 17 दिवसाचे अंतर असल्याचे त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार

“आमरण उपोषणाच्या 17 दिवसांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहे. जगलोच तर अठराव्या दिवशी तसाच ॲम्बुलन्समधून शांतता रॅलीत सहभागी होईन.”, असं वक्तव्य जरांगे पाटील(Manoj Jarange) यांनी केलंय. त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलंय.

यावेळी त्यांनी राज्य सरकारवर देखील टीका केली. सरकार जर 17 दिवस मरण्याची वाट बघत असेल तर हे सरकारच असू शकत नाही, असं जरांगे म्हणाले. तसंच 20 तारखेला यांचे 288 आमदार पाडायचे की ठेवायचे हे ठरवणार असल्याचेही ते म्हणाले.

7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार

आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. 7 ऑगस्टपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून सोलापूरपासून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. यानंतर सांगली , कोल्हापूर ,सातारा व पुणे येथे शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला देखील आवाहन केलं. एक दिवस कामे बंद ठेवून मोठ्या संख्येने ताकद दाखवायची आहे. ज्या शहरात रॅली आहे तेथील मराठ्यांनी सहकुटुंब सहभागी व्हावे, असं आवाहन जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केलंय.

News Title –  Manoj Jarange Big statement

महत्त्वाच्या बातम्या-

“येणाऱ्या काळात लाडके आजोबा, लाडकी आजी, लाडकी मुलगी योजनाही येतील”; कॉँग्रेसचा टोला

मद्यप्रेमींसाठी मोठी गुड न्यूज; ‘या’ 6 राज्यांमध्ये मिळणार घरपोच दारू

पुणे हादरलं! सासवडमध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ

अभिनेत्री जान्हवी कपूरला झाली विषबाधा?, रुग्णालयात उपचार सुरू

“अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का?”; योजनेसाठी काम करण्यास अंगणवाडी सेविकांचा नकार