मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा, मराठा आरक्षणानंतर आता…

Manoj Jarange | राज्य सरकारने मराठा समाजाला सगेसोयरे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं, पण ते पूर्ण न केल्यामुळे आपण विधानसभा निवडणुकांची तयारी करत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे दिवसेंदिवस मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. अशात मनोज जरांगेंनी मोठी घोषणा केली आहे.

जरांगेंची मोठी घोषणा

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आता शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुढचं आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करणार असल्याचं म्हटलं आहे.

मतदार संघानिहाय बैठकांमध्ये मराठा आरक्षणासह शेतकरी आणि इतर सर्वच मुद्दे घेण्यात येणार असल्याचं मनोज जरांगे (Manoj jarange) यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सांगितलं आहे.

Manoj Jarange | “शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे”

मी शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू करणार असून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे राहिले आहेत, सरकार प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना फसवते, आता सरकार कसं कर्जमाफी करत नाहीत हे पाहतो, असं जरांगे म्हणालेत.

महाराष्ट्रातील 700 ते 800 इच्छुक उमेदवारांनी माझी भेट घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. उमेदवारांचं फार भयाण काम आहे. उमेदवार पाहिले की वाटतं कुठून या लफड्यात पडलो. मरणाचे उमेदवार आहेत, असं जरांगेंनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

तज्ज्ञांचा पालकांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला; मुलांना ‘या’ गोष्टी नक्की शिकवा

मोठी बातमी! भाजपच्या विद्यमान आमदारांचं भविष्य धोक्यात?

ऐश्वर्या-अभिषेकचं लग्न थांबवण्यासाठी जान्हवी कपूरने कापली होती नस; मोठा खुलासा समोर

पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; IMD कडून महत्वाचा इशारा

“बावनकुळे राजकारणातली वाया गेलेली केस, त्यांनी..”; संजय राऊतांची जहरी टीका