Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज (6 जुलै) हिंगोलीतून सुरुवात झाली आहे. एकट्याच्या लढण्यात आणि करोडोंच्या लढण्यात खूप शक्ती असते, त्यामुळे मराठा समाजाने या शांतता रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे, आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले.
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. ” भुजबळ यांना दुसरे काही काम नाही, त्यांनी सर्व पडेल लोक गोळा केले आहेत. सर्वांना काय भाषण करायचं हे वाटून दिलंय.”,अशी टीका जरांगे पाटील यांनी केलीये.
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
तसंच “राज्य सरकारला हा रोष परवडणारा नाही. त्यांनी मराठ्यांना कमजोर समजू नये. बीड जिल्ह्यातील मराठ्यांवरील त्रास थांबवा.”, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिलाय. आज ते शांतता रॅलीदरम्यान माध्यमांशी संवाद साधत होते.
“आम्ही सरकारवर विश्वास दाखवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास टाकलाय. त्यामुळे त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात.अन्यथा आणखी मोठा जनसमुदाय उसळेल.”, असंही जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले आहेत.
जरांगेंच्या शांतता रॅलीला आजपासून सुरूवात
पुढे ते म्हणाले की, “आंदोलक म्हणून आशा बाळगणे माझे कर्तव्य आहे. आम्ही सरकारकडून 13 तारखेपर्यंत आशा ठेऊन आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस अंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेतील, असा आम्हाला विश्वास आहे.”, अशी अपेक्षा यावेळी जरांगे यांनी व्यक्त केली.
तसेच, राजकीय इच्छा शक्ती असली तर 7 दिवस नाही, 2 घंट्यात कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात, असं सरकारला उद्देशून मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. आता 13 तारखेला सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या तरी जरांगे पाटील (Manoj Jarange) हे शांतता रॅली करत आहेत. आजपासून 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ही जनजागृती रॅली असणार आहे.
News Title – Manoj Jarange challenge to state government
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक-नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला पुन्हा जोर; पत्नीला सोडून पांड्या चक्क..
काळजी घ्या! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या दरात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोनं फक्त..
सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार; बटाटा-कांदा-टोमॅटोचे भाव तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले
अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात अमृता फडणवीस अन् लेक दिविजाच्या लुकने वेधलं लक्ष; पाहा Video