Manoj Jarange l गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाच्या मुद्द्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अशातच या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत.
मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली :
मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीत 8 जूनपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र मनोज जरंगे पाटील यांनी प्रकृती खालावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आंतरवाली सराटीत तैनात असणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास पूर्णपणे नकार दिला होता.
यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे आज पहाटे अडीच वाजता मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी आग्रह धरण्यात आला आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील आणि डॉक्टरांच्या टीमने मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढून त्यांना उपचार घेण्यासाठी तयार केले. यानंतर मनोज जरांगे पाटील यांना पहाटेच्या सुमारास तीन सलाईन लावण्यात आल्या आहेत.
Manoj Jarange l मनोज जरांगेंचा ब्लड प्रेशर कमी झाला होता :
याशिवाय जालन्याच्या आरोग्य जिल्हाधिकारी जयश्री भुसारे यांच्या नेतृत्त्वाखालील डॉक्टरांच्या टीमने मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती. यानंतर आरोग्य जिल्हाधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या मनाला की, मनोज जरांगे यांचा रक्तदाब कमी झाला आहे. त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस असल्याने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी देखील खालावली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना शक्य तितक्या लवकर उपचारांची गरज असल्याचे आरोग्य जिल्हाधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी सांगितले होते.
अंबडचे जिल्हाधिकारी चंद्रकांत शेळके यांनी काल मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना उपचार करुन घेण्याची विनंती देखील केली होती. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीचे अपडेट्स सरकारला कळवले होते. तसेच राज्य सरकार देखील सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणावर लक्ष ठेवत आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारकडून कोणालाही मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करायला पाठवलं नाही.
News Title – Manoj Jarange condition deteriorated
महत्त्वाच्या बातम्या
या राशीच्या व्यक्तींनी नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी!
‘बजरंग सोनवणेंचा अजितदादांना फोन’, अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ
जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती, आमदार, खासदार जरांगेंच्या भेटीला
काँग्रेस अन् ठाकरे गटात वादाची ठिणगी; ठाकरेंनी नाना पटोलेंचा फोन घेणं टाळलं?