Manoj Jarange Factor | मराठवाड्यातील मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टरचा परिणाम दिसून आला आहे. आता परभणी, बीड, जालना, नांदेड मतदारसंघात जरांगेंचा प्रभाव दिसला. मनोज जरांगे पाटील यांनी बीड, जालना लोकसभा मतदारसंघात जात अनेकदा आंदोलन आणि उपोषण केलं होतं. त्याचा परिणाम आता लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाला आहे. हिंगोली आणि धाराशिवमध्ये देखील मनोज जरांगे फॅक्टर (Manoj Jarange Factor) दिसून आला. एवढंच काय तर दानवेंची गेली 25 वर्षे असलेली सत्ता घालवण्याचं काम मनोज जरांगेंच्या फॅक्टरने (Manoj Jarange Factor) यशस्वी ठरली.
मराठवाड्यात जरांगे फॅक्टर
बीड, परभणी आणि जालना तसेच इतर काही मतदारसंघामध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा परिणाम झाल्याचं दिसत आहे. यामुळे मराठा विरूद्ध ओबीसी असं मतांचं ध्रुवीकरण पाहायला मिळालं आहे. दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण आणि हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकर यांनी विरोधी उमेदवारांवर विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयात मनोज जरांगे यांचा मोठा एक्स फॅक्टर (Manoj Jarange Factor) जाणवतो.
मनोज जरांगे पाटील यांचा सर्वाधिक परिणाम हा बीड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाला आहे. अद्यापही मतमोजणी सुरू आहे. बीड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला आहे. मात्र या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून बजरंग सोनवणे पंकजा मुंडे यांना भारी पडत आहेत. (Manoj Jarange Factor)
मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मतांचं ध्रुवीकरण
तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत बजरंग सोनवणे आघाडीवर होते. मात्र त्याठिकाणी गोंधळ झाला असल्याची माहिती आता समोर आली आहे. तसेच परभणी मतदारसंघात महायुतीकडून महादेव जानकर लढले तर महाविकास आघाडीकडून संजय जाधव लढले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं असल्याचं चित्र दिसलं आहे.
News Title – Manoj Jarange Factor Active In Marathwada News Update
महत्त्वाच्या बातम्या
स्मृती इराणींचा दारूण पराभव, सोशल मीडियावर लोकांनी उडवली खिल्ली
बीडमध्ये धाकधुक वाढली! पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपणार?
शरद पवारांच्या हातून बालेकिल्ला निसटला, पवारांच्या शिलेदाराचा पराभव
नगरमध्ये लंके पॅटर्न! इंग्रजी बोलायला लावणाऱ्या सुजय विखेंची बोलती बंद
उद्धव ठाकरेंचा एक शिलेदार अवघ्या 48 मतांनी पराभूत