मोठी बातमी! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, संभाजीराजे घेणार भेट

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज 23 सप्टेंबररोजी त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. जालन्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या मूळगावी त्यांचं उपोषण सुरु आहे. मात्र, सध्या जरांगे यांची प्रकृती खूपच खालावली असल्याची माहिती समोर येत आहे. उपोषणस्थळावरून खाली उतरताना मनोज जरांगे यांना भोवळ आली होती. यावेळी मंत्री शंभुराज देसाई यांनी फोन करत त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. (Manoj Jarange )

आता मिळालेल्या महितीनुसार, संभाजीराजे छत्रपती अंतरवलीत जाणार आहेत. ते आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत. दोघांत मराठा आरक्षणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. जरांगे यांची प्रकृती खालावल्याने समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

संभाजीराजे छत्रपती अंतरवलीत येणार

जरांगे यांना उपोषणस्थळी भोवळ आली होती. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याने त्यांना थकवा आणि अशक्तपणा जाणवत आहे. त्यांना उपचारांची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांना सलाईन लावण्यात आली होती. तेव्हा त्यांची तब्येत थोडीफार सुधारली होती. अशात त्यांची तब्येत पुन्हा खालावली आहे. (Manoj Jarange )

दरम्यान, उपोषण सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी जालन्यातील वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी समाजाचे समन्वयक आमनसामने आले होते. तेव्हा चांगलाच वाद निर्माण झाला होता. ओबीसी कार्यकर्ते आणि अंतरवाली सराटीतील मराठा कार्यकर्ते यांच्यात वाद झाल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली होती. वडीगोद्री येथे ओबीसीकडून उपोषण सुरू आहे. याच्या अवघ्या 3 किमी अंतरावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे.

मनोज जरांगे यांना भोवळ

त्यातच वडीगोद्रीतील बॅरिकेटिंग करण्यात आल्याने मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाले होते. यावर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. “आम्हाला मनोज जरांगे आणि हाके दोघांच्याही तब्येतीची काळजी आहे. मात्र जपून विधानं करणं देखील आवश्यक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही. ओबीसींच्या मनात गैरसमज होता कामा नये”, असं केसरकर म्हणाले होते. (Manoj Jarange )

News Title :  Manoj Jarange health deteriorated

महत्वाच्या बातम्या –

“आमचं चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होण्याची गॅरंटी”

आज ‘या’ राशींवर राहणार महादेवाची कृपा; सर्व इच्छा-आकांक्षा होणार पूर्ण!

MMS व्हिडीओनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडीओ तूफान व्हायरल!

शेतकऱ्यांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा, भरसभेत दिलं आश्वासन

भडकलेल्या वसंत मोरेंनी थेट हातोडा चालवला, नेमकं काय घडलं?