मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

Manoj Jarange

Manoj jarange Health | मराठा आंदोलनाचे जनक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आलीये. छत्रपती संभाजीनगर येथील एका रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. सध्या उन्हाचा पारा वाढत चालला आहे. जिकडे तिकडे उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. काही दिवसांआधी धाराशिव येथे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली. तर आज यवतमाळ येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती (Manoj jarange Health) बिघडली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

मनोज जरांगे पाटील हे उन्हाच्या तडाख्यात आंदोलन करत आहेत. काही दिवसांआधी त्यांनी मराठा समाजासाठी उपोषण केलं आहे. मराठा समाजाला सरकारने 13 टक्के आरक्षण दिलं. मात्र हे आरक्षण मनोज जरांगे आणि मराठा समाजाला मान्य नाही. मनोज जरांगे सगेसोयरे अंमलबजावणीची सरकारकडे मागणी करत आहेत. सध्या मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील हे ठिकठिकाणी सभा घेताना दिसत आहेत. दरम्यान, बीड येथे दौरा करत असताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आलीये. (Manoj jarange Health)

मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. (Manoj jarange Health)

मनोज जरांगे गॅलेक्सी रूग्णालयात दाखल

मनोज जरांगे पाटील यांना याआधी देखील गॅलेक्सी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांची उपोषणामुळे प्रकृती बिघडली होती. मात्र आता त्यांना उन्हाने त्रास झाला असल्याची माहिती समोर आलीय. यामुळे जरांगे पाटलांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मराठा समाज आणि समर्थकांकडून मनोज जरांगे बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत. (Manoj jarange Health)

News Title – Manoj jarange Health Update News

महत्त्वाच्या बातम्या

“…तर मी राजकारणातून संन्यास घेईल”, महादेव जानकरांची मोठी घोषणा

‘…तर पुढे काही घडू शकतं’; पवारांसोबत जाण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

इतक्या वर्षांनंतर आमिर खानचा मोठा खुलासा, म्हणाला ‘वेळ खूप…’

शरद पवारांचा राज ठाकरे पॅटर्न, भरसभेत लावला मोदींचा ‘तो’ व्हिडीओ

“कोण पृथ्वीराज चव्हाण?, मी माझ्या स्टेटसच्या व्यक्तीसोबत बसतो”

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .