मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा

Manoj Jarange hunger strike in January

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा अॅक्टिव झाले आहेत. आज (17 डिसेंबर) त्यांनी पत्रकार परिषद घेत मोठी भूमिका जाहीर केली. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. विधानसभेच्या निवडणुकीमुळे जरांगे यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं. आता निवडणुका झाल्या, निकालही लागले आणि सरकार देखील स्थापन झाले. (Manoj Jarange)

अशात जरांगे यांनी पुन्हा आपल्या मागण्यासाठी उपोषणाची तयारी केली आहे.यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्राद्वारे मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलंय. त्यांनी हे उपोषण कधी होणार, कुठे होणार याबाबतची सर्व माहिती पत्रकार परिषदेत दिली.

काय म्हणाले जरांगे पाटील?

“सरकारला वाईट वाटेल, पश्चाताप होईल, इतकं भयंकर आणि मोठं आंदोलन उभा केलं जाईल. मराठा समाजाच्या एकजुटीने सरकारचे डोळे विस्फारतील”, असं जरांगे म्हणाले. त्यांनी राज्यभरातील मराठ्यांना अंतरवली-सराटीला एकत्र जमण्याचं आवाहन केलंय.

“अंतरवली-सराटीत तुफान ताकदीने मराठ्यांनी एकत्र यायचं. एकाही मराठ्याने घरी थांबायच नाही, सर्वांनी इथे यायचं. “, असं जरांगे म्हणाले. येत्या 25 जानेवारीपासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितलं. ज्यांना स्वेच्छेने उपोषणाला बसायच आहे, ते बसू शकतात. पण कोणावरही जबरदस्ती नसेल असं, जरांगे (Manoj Jarange) यांनी स्पष्ट केलं.

25 जानेवारीपासून आमरण उपोषण-

“मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. म्हणून मागच्या 15-16 महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. मराठ्यांची एकजूट कायम आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन कायम राहणार आहे. मराठा समाज इतक्या ताकदीने एकजुटीने लढला, तरी अजून मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही.त्यामुळे पुन्हा उपोषण केलं जाईल”, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

News Title –  Manoj Jarange hunger strike in January

महत्त्वाच्या बातम्या-

‘…तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा

‘पुष्पा 2’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार? जाणून घ्या कधी व कुठे

शिंदे गटातील ‘हा’ बडा आमदार बंडाच्या तयारीत?, प्रोफाइलवरून धनुष्यबाण हटवलं

नाराज झालेल्या छगन भुजबळांना मंत्रीपदापेक्षाही मोठं पद मिळणार?, कुणी केला दावा?

‘मंत्री करा, अन्यथा..’, ‘या’ आमदारासाठी शिंदे गटात सामूहिक राजीनाम्याची तयारी?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .