Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला.
“ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्यांना त्रास देतील, त्या जातीचा नेता आम्ही पाडणार. आल्याच विधानसभा निवडणुका जवळ.”, असं म्हणत नाव न घेता जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना इशारा दिलाय. आज जालन्यात अंतरवाली सराटी येथे माध्यमांसोबत संवाद साधताना जरांगे पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली.
“..त्या जातीचा नेता पाडणार”
“आमच्या लोकांना बीड, माजलगाव, केज, गेवराई येथे मारहाण झाली. त्यांच्या नेत्याचे काम आहे, त्यांच्या जातीला शांततेचे आवाहन करण्याचे. जरांगे पाटील शांततेचे आवाहन करत आहेत, तुम्ही का करत नाही? ते मजा बघतात, परदेशात जाऊन झोपतात आणि इकडे धिंगाणा लावून दिलाय.”, असं म्हणत जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी संताप व्यक्त केला.
पुढे त्यांनी थेट मुंडे भाऊ-बहिणीवर निशाणा साधला. “मी कुणाला पाडा म्हणालो का? कुणाला निवडून आणा म्हणालो का? काय घोषणा होत्या त्या दिवशी कलेक्टर ऑफिससमोर? मस्ती आहे का? मी काय केलं होतं? पाडा म्हणालो का तिला? तरीही मी माझ्या समाजाला आवाहन केलंय. मराठ्यांनो शांत रहा एक दोन महिने. यांना चुका करू द्या. ज्या दिवशी नरड्याला लागेल त्या दिवशी बघू.”, असा इशाराच यावेळी जरांगे पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना दिला.
“मराठ्यांनो एक दोन महिने शांत राहा”
यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन देखील केलं. “मराठा समाजाला माझं आवाहन आहे की, शांत राहा. यांना काय अन्याय करायचा ते करू द्या.महाजनवाडी येथील लोकांनाही यांनी बराच त्रास दिलाय. तरी तुम्ही शांत राहा.”, असं जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले आहेत.
तसेच, ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्यांना त्रास देतील, त्या जातीचा नेता पाडणार आम्ही. वेळ प्रसंगी तेथे उमेदवार देणार नाही, पण त्याला पाडणार. असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे. आता याला मुंडे भाऊ-बहीण काय प्रतिक्रिया देतात ते पाहावं लागेल.
News Title – Manoj Jarange indirectly targeted Dhananjay Munde
महत्त्वाच्या बातम्या-
गर्भवती महिलेला कारने दिली धडक, भयंकर अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर
राष्ट्रवादीला एकही मंत्रीपद नाही?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली अडचण
‘पंकजा मुंडेंना कॅबिनेटमंत्री करा’; बीडमध्ये झळकले बॅनर्स
मंत्रीपदासाठी अजित पवार गट अजूनही वेटिंगवरच?; समोर आलं मोठं कारण
‘सगळ्याचं श्रेय पुणेकरांना…’, मंत्रीपदाबाबत बोलत असताना मोहोळ भावूक