“महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर…”; जरांगे पाटलांची नवी मोठी घोषणा

Manoj Jarange new big announcement

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांनी स्वतः मीडियाशी संवाद साधताना माहिती दिली आहे. जरांगे यांनी पंढरपूर येथे नुकतेच पांडूरंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी आणि आरक्षणासाठी बळ मिळू दे, असं साकडं पांडूरंगला घातलं. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी जरांगे (Manoj Jarange ) यांनी पुढील दिशा स्पष्ट केली.

महायुती सरकार स्थापन होताच आम्ही पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार, असं जरांगे म्हणाले आहेत. अंतरवली सराटीमध्ये मराठा घरातील प्रत्येक नागरिक उपोषणात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही समाजासोबत बैठक घेणार असून त्यानंतर उपोषण मुंबईत करायचे की अंतरवलीमध्ये, ते ठरवले जाईल.पण शक्यतो मुंबईतच आंदोलन होईल, असं जरांगे पाटील म्हणाले.

मुंबईत सामूहिक उपोषण करणार- जरांगे

यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास त्यांना शुभेच्छा देणार का, असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी केला. त्यावर जरांगे यांनी फडणवीस यांना अगोदर मुख्यमंत्रीपदी शपथ तर घेऊ द्या, तुम्हालाच इतकी का घाई झाली आहे?, असा खोचक प्रतिसवाल माध्यम प्रतिनिधींना केला.

तसेच, सरकार कुणाचंही असलं तरीही मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार असंही जरांगे म्हणाले. विधानसभा निवडणूक लढविण्याचा फॉर्म्युला जुळला नाही, नाहीतर सुफडा साफ केला असता, असं मनोज जरांगे (Manoj Jarange ) यांनी म्हटलं आहे.

“..तर सुपडासाफ केला असता”

महाराष्ट्रामध्ये मराठ्यांशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, यावेळी मराठा समाजाने ओबीसी आमदार सुद्धा निवडून आणले आहेत. विधानसभा निवडणूक लढविण्याचा फॉर्म्युला जुळला नाही, नाहीतर सुफडा साफ केला असता. आम्ही आरक्षणाची चळवळ थांबवणार नाही, असंही जरांगे पाटील (Manoj Jarange ) म्हणाले.

News Title :  Manoj Jarange new big announcement

महत्वाच्या बातम्या –

सिनेविश्वात खळबळ, प्रसिद्ध अभिनेत्रीचा ‘त्या’ अवस्थेत आढळला मृतदेह

आज भोलेनाथ ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न, प्रत्येक कामात मिळणार यश!

मनसेला आणखी एक धक्का; पराभवानंतर ‘या’ नेत्याने घेतला मोठा निर्णय

‘त्यांना फक्त व्हर्जिन मुली….’; अभिनेत्रीच्या खुलाशाने एकच खळबळ

सिंगल लोकांनी ‘या’ वेबसिरीज पाहूच नयेत!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .