“मराठ्यांचे मत घेईपर्यंत गोड बोलायचं, नंतर..”; जरांगे पाटलांचा खासदार कोल्हे यांच्यावर हल्लाबोल

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देत आहेत. जरांगे यांनी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला काही दिवसांचा अवधी दिला आहे. या वेळेत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर, थेट विधानसभेसाठी तयारी करू असा इशाराच त्यांनी (Manoj Jarange) दिलाय.

दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं दिसून आलं.

मनोज जरांगे यांनी नेमकं काय म्हटलं?

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील आरक्षणाचा मुद्दा संसदेत उपस्थित केला.महाराष्ट्रात जातीय जनगणना व्हावी. पण,  कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी कोल्हे यांनी केली होती. यावरच आता जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जरांगे यांनी खासदार अमोल कोल्हे आणि खासदार बजरंग सोनवणे यांना चांगलंच सुनावलं आहे. “मराठ्यांचे मतं घेईपर्यंत पुण्यात गोड बोलायचं, एकदा मतं घेतली की जात जागी झाली त्यांची.आमच्या मराठ्यांना हेच समजत नाही. पण, आता मराठ्यांचे डोळे उघडले आहेत.”, असं म्हणत जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी अमोल कोल्हे यांना टार्गेट केलं.

अमोल कोल्हे आणि बजरंग सोनवणे यांच्यावर निशाणा

तसंच, “एखाद्याला मराठ्यांनी खासदार केलं. 5 वर्षांसाठी त्याला वाटत असंल आता मला काही नाही. पण, आमदारकीला त्याच्या जीवाचे कोणी ना कोणी उभा करतील ना, मराठे ते पाडतील.”, असं म्हणत जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी नाव न घेता बजरंग सोनवणेंवर देखील निशाणा साधला.

दरम्यान, संसदेत अमोल कोल्हे यांनी मराठा आरक्षणावरुन भूमिका मांडली होती. महाराष्ट्रात जातीय जनगणना झाली पाहिजे. पण, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, असं कोल्हे म्हणाले होते. यावर बजरंग सोनवणे यांनी बाक वाजवून आपलं समर्थन दिलं होतं.

News Title – Manoj Jarange on Amol Kolhe

महत्त्वाच्या बातम्या-

भर पावसाळ्यात ‘या’ शहरात पाणीटंचाईचे चटके; नागरिकांनो पाणी जपून वापरा!

“राज्याचे गृहमंत्री युजलेस”, संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले खडेबोल

“मी बॉलिवुड अभिनेत्रीशी..”; क्रिकेटपटू कुलदीप यादवने लग्नाबाबत अखेर सोडलं मौन

शरद पवारांचा भाजपला दे धक्का! माजी आमदाराचा राजीनामा, लवकरच हाती घेणार तुतारी?

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा!