“छगन भुजबळांचं उभं आयुष्य गोरगरीबांचं आरक्षण हिसकावण्यात गेलंय”

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (18 जून) माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मराठा आरक्षणावरून त्यांनी भुजबळ यांना खडेबोल सुनावले.

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा अवधी देत आपलं उपोषण मागे घेतलं आहे. अशात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. जरांगे यांनी एक महिन्यात सरकारने निर्णय घेतला नाही तर, विधानसभेत पूर्ण तयारीने उतरू, असा इशाराच दिला आहे.

“..याचा विचार संपूर्ण राज्याने केला पाहिजे”

तर, दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी उपोषण सुरु केलं आहे. एकीकडे जरांगे यांनी ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे तर, दुसरीकडे ओबीसीने आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, यासाठी आंदोलन सुरू केलंय. यामुळे राज्य सरकारपुढे मोठा पेचच निर्माण झाल्याचं चित्र आहे.

या पार्श्वभूमीवरच बोलताना जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. “त्यांना आरक्षण असून ते इतके विरोधात लढत आहेत. आम्हाला आरक्षण नाही तर आम्ही किती लढू याचा विचार संपूर्ण राज्याने केला पाहिजे,” असं जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत.

भुजबळ यांचं उभं आयुष्य पाप करण्यात गेलं

तसंच “कोणत्या पक्षाचा नेता असो जे मदत करणार नाही, त्यांना उघडं पाडल्याशिवाय मराठा राहणार नाही,” असा इशारा जरांगे पाटलांनी सर्व राजकारण्यांना दिला आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील निशाणा साधला.

“छगन भुजबळ यांचं उभं आयुष्य गोरगरीबांच्या लेकरांचं आरक्षण हिसकावून घेण्यात आणि पाप करण्यात गेलंय. त्यामुळे आता कोणाला काय सांगायची गरज आहे का? ते विरोधातच आहेत. उभं आयुष्य त्यांनी त्यातच घातलं आहे. लोकांच्या लेकरांचे मुडदे कसे पडतात?, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. मराठ्यांच्या लेकरांच्या नरड्याला नख लावायचं काम त्यांनी उभं आयुष्यभर केलेलं आहे. ते आमच्याकडून बोलतील अशी अपेक्षाच मला नाही,” अशी टीका जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे.

News Title :  Manoj Jarange on Chhagan Bhujbal

महत्त्वाच्या बातम्या-

मॉन्सूनची गती मंदावली, महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा?; IMD कडून महत्वाची अपडेट

“शिंदेंना शह देण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं”; बच्चू कडूंचा भाजपवर खळबळजनक आरोप

टीम इंडियाला नवीन हेड कोच मिळणार? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

‘बाईच्या नादामुळं जो बापाचा नाय झाला…’, या खेळाडूवर पत्नीचा खळबळजनक आरोप

पोलीस भरती पुढे ढकला; ‘या’ नवनिर्वाचित खासदाराची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी