Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यावर निशाणा साधत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अनिल बोंडे यांनी एका ठिकाणी भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय समन्वयक श्याम मानव आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
श्याम मानव आणि जरांगे-पाटील यांच्या रूपाने देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावर कुत्रे सोडले आहेत, असं खासदार बोंडे म्हणाले होते. त्यांच्या या टीकेलाच आता जरांगे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. आज ते अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला.
जरांगे फडणवीसांवर बरसले
“तू माझ्या नादी लागू नको. हे सगळं देवेंद्र फडणीस करत आहे. देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत नाहीये, त्यांचं राजकीय करियर संपवून जाईल.”, असं जरांगे म्हणाले आहेत. इतकंच नाही तर, फडणवीस यांना भांडण घडवून आणायचे आहेत. आमच्या जवळचे लोक फोडतात आणि त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावतात. जर राणे साहेब जाहीर धमकी देणार असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही. फडणवीस आरक्षण देणार नसले तर आम्ही त्यांना रोज बोलणार आहे.असा इशाराच जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे.
जरांगे पाटील यांची भाजपवर टीका
“मागच्या दाराने जे विधान परिषदेवर गेले आहेत, ते सगळे फडणवीस यांनी पाळले आहेत. ते सगळे गुंड आहेत.ते दुसऱ्यांवर सोडण्यासाठी पाळलेले गुंड आहेत.”, अशा शब्दांत जरांगे (Manoj Jarange) यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.
पुढे जरांगे आणि नारायण राणे यांच्यावर देखील टीका केली. “मी गोरगरिबांसाठी काम करतोय. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना मोठं करण्यासाठी माझ्या समाजाचं वाटोळं करू नका. मी नारायण राणे यांचा सन्मान करतो. मी मराठा समाजाचे काम करतो म्हणून तुम्ही मला धमक्या देताय.पण, मला धमकी देण्याची गरज नाही”, असं जरांगे म्हणाले आहेत.
News Title : Manoj Jarange on Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या-
दुचाकी बाईक चालवण्याआधी ही बातमी वाचा; या लोकांवर होणार थेट कारवाई
गोविंदाच्या भाचीने सोशल मीडियावर घातला धूमाकुळ, पतीसोबतचे ते फोटो व्हायरल
भाजपचं टेन्शन वाढलं; विधानसभेसाठी मनसेचे दोन उमदेवार जाहीर, पाहा कोण आहेत?
“राज ठाकरेंना तुरुंगात टाकलं पाहिजे”; प्रकाश आंबेडकरांची थेट मागणी
रक्षाबंधन बनवा खास; तुमच्या बहिणीला गिफ्ट द्या ‘हे’ स्वस्तात मस्त स्मार्टफोन