Manoj Jarange l विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात अनेक मोठ्या उलाढाली होत आहेत. अशातच अर्ज घेण्याची मुदत देखील संपली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील मतदारसंघ निवडताना काल रात्री मनोज जरांगे यांनी निवडलेली यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूला झुकणारी असल्याची चर्चा सुरू झाली होती.
Manoj Jarange l एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का :
मात्र आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे हा एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. तसेच हदगाव, भूम – परंडा, धाराशिव, कळमनुरी, कन्नड या ठाकरे गटाच्या मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय देखील मनोज जरांगे यांनी जाहीर केला होता.
याशिवाय तानाजी सावंत यांच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उमेदवार देऊ नका अशी मागणी देखील जरांगे यांच्या समोर कार्यकर्ते करत होते, तरीही त्यांनी हा मतदारसंघ सर्वात आधी जाहीर केला होता. त्यानंतर कन्नड व धाराशिव या दोन मतदारसंघात ठाकरे गटाचे दोन ‘ निष्ठावान’ आमदार असल्यामुळे मनोज जरांगे यांनी उमेदवारीसाठी जाहीर केलेल्या मतदारसंघावर उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. मात्र आज सकाळी मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने जरांगे यांनी ‘आंदोलक’ ही प्रतिमा एकप्रकारे वाचवली असल्याचं दिसून येत आहे.
News Title – Manoj Jarange on eknath shinde
महत्त्वाच्या बातम्या-
सुनील शेळकेंचा गेम होणार?, मावळ पॅटर्नला मनसेचा पाठिंबा
राज्यात ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा!
मविआच्या मागणीला यश, अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं
मनोज जरांगेंच्या निर्णयावर लक्ष्मण हाकेंची खरपूस प्रतिक्रिया; म्हणाले…
HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस बंद राहणार!