“मराठ्यांनो, अपक्ष उमेदवार उभे करु नका”, मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं कारण

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (30 मार्च) रोजी जालना यथील अंतरवाली सराटी गावात लोकसभा निवडणूकीबाबत महत्त्वाची बैठक घेतली. जरांगेंच्या बैठकीला मराठा समाजाने चांगलाच पाठिंबा दिला. गावागावातून मराठा समाजाचा उमेदवार देणार अशा चर्चा देखील सुरु होत्या. मात्र याबाबत जरांगे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि मराठा समाजाचं लक्ष लागलं होतं. अखेर अंतरवालीत पार पडलेल्या बैठकीत जरांगेंनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय.

काय म्हणाले जरांगे?

अंतरवाली सराटी येथे जरांगेंनी (Manoj Jarange)  बैठक घेतली. यावेळी बोलत असताना जरांगे म्हणाले की, गावागावतून मी अहवाल मागवला होता. मात्र मला आलेला अहवाल चुकीचा आणि आर्धवट होता. शिवाय हा अहवाल मराठ्यांपर्यंत आलेलाच नाही. या अहवालात चुकाही असल्याचं जरांगे म्हणाले. त्यामुळे या अहवालावर मी अपक्ष उमेदवार देऊन मराठा समाजाची फसवणूक करणार नाही.

मी अपक्ष उमेदवार देणार नाही- जरांगे

पुढे ते म्हणाले की, “मी अपक्ष उमेदवार देणार नसून ज्याला पाडायचं त्याला पाडा. तुमच्या बाजून जो असेल त्याला निवडून द्या. हे मराठ्यांनी ठरवा. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पडायचं नाही,” असं जरांगेंनी जाहीर केलं आहे. मात्र नंतरही यांनी सगेसोयरे शब्दाची अमंलबजावणी केली नाही तर विधानसभेची तयारी करा, असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे.

“राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचं”

बोलत असताना जरांगे म्हणाले की, आपण बैठक घेतली, त्यामध्ये काय करायचं हे ठरवलं होतं? परंतु त्या बैठकीमध्ये आपण कोणताच निर्णय घेतला नाही. याचं कारण म्हणजे राज्यात आपले करोडोने माय बाप आहेत, निर्णय जो घ्यायचा तो ठरवूच. मात्र, गावखेड्यातल्या मराठ्यांना विचारनं गरजेचं होतं. त्यानुसार सगळ्यांनी काम सुरु केलं आहे.

मात्र अहवाल वाचून जे लक्षात येतं त्याची चर्चा होणं गरजेची आहे. आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं आहे. यात आरक्षण कुणीच घेईना उमेदवारच जास्त झाले आहेत. त्या प्रक्रियेत गेल्याशिवाय न्याय मिळत नाही. मात्र, त्याच्या शिवाय आरक्षणच कुणाच्या लक्षात येत नाहीये असं जरांगे म्हणाले. राजकारणापेक्षा रक्तात आरक्षण पाहिजे. मला माझ्या जातीचं वाटोळं काही बनायचं नाही, असं जरांगे म्हणालेत.

News Title :  manoj jarange on loksabha election 2024

महत्त्वाच्या बातम्या-

लोकसभेला कुणाला मतदान करायचं?, मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा

पुन्हा निर्णय बदलला!, जरांगे पाटलांची लोकसभा निवडणुकीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा

Pune News: लोणावळ्यात एका बंगल्यात 15 तरुण-तरुणी, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक माहिती उघड

धक्कादायक!!! “अजित पवारांनी केलेल्या सर्व्हेत सु्प्रिया सुळे आघाडीवर, इतक्या मतांनी होतील विजयी”

‘मला माहिती नसताना…’; छगन भुजबळ यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!