Manoj Jarange l गेल्या कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याचं दिसत आहे. अशातच आता मराठा आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. मात्र त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस असल्यानी जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी त्यांचं उपोषण थांबवलं आहे. मात्र आता त्यांची तब्येत प्रचंड खालावल्याने त्यांनी उपोषण स्थगित करावं अशी मागणी अंतरवाली सराटी येथे जमलेल्या मराठा बांधवांनी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलं आहे.
मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित :
बीड जिल्ह्यातील अंतरवालीमध्ये जमलेल्या महिला आणि बांधवांच्या हस्ते पाणी पिऊन मनोज जरांगें पाटलांनी हे आंदोलन स्थगित केलं आहे. यावेळी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावर आता छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
मंजु जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषणसाठी बसले होते. पण या काळात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने कोणतंही पाऊल उचललं नाही. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील मनोज जरांगेंच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.
Manoj Jarange l सरकारने कोणतही पाऊल उचललं नाही :
दरम्यानच्या आज उपोषणाच्या नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. त्यामुळे त्यांनी उपचार घ्यावेत असा आग्रह अंतरवाली येथे जमलेल्या बांधवांनी केला होता. मात्र उपोषणाच्या काळात जरांगेंना दोन वेळा सलाईन देखील लावण्यात आल्या होत्या. मात्र आता त्यांची तब्येत जास्त प्रमाणात खालावल्याने त्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे.
तसेच गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन हे मनोज जरांगेंनी स्थगित केल्यानंतर त्यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे. मराठा समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पाडापाडी झाली तर त्याला मला जबाबदार धरू नका असा इशारा त्यांनी दिला आहे.
News Title : Manoj Jarange On Vidhansabha Election
महत्वाच्या बातम्या-
पोलिसांनी अक्षयचा एन्काऊंटर केलं असेल तर डबल अभिनंदन; शर्मिला ठाकरे असं का म्हणाल्या?
अरबाज पटेल पुन्हा बिग बॉसमध्ये झळकणार?
अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मोठा प्रश्न उपस्थित
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; उद्या ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार
गायिका नेहा कक्करचं लग्न मोडणार?, रोहनप्रीत सिंहपासून घेणार घटस्फोट?