“तुला तंगडी सकट बाहेर ओढतो”; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा

Manoj Jarange Patil | लोकसभा निवडणुकीत देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्याविरोधात असलेल्यांना असं पाडा की त्यांच्या पाच पिढ्या घरी बसल्या पाहिजे , असं वक्तव्य केलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. (Manoj Jarange Patil)

“येवल्यावाल्याला तंगडीसकट बाहेर ओढतो”

तो येवलावाला म्हणत आहे की, आम्ही 60 टक्के आहे. तु काय आम्हाला बधीर समजतो का? त्यानंतर म्हणे की एसटी फुल भरलेली आहे. मी म्हटलं की मला दार उघडू दे. एसटीमध्ये तुच एकटा तंगड्या पसरून बसला आहे. तुला एकदीवस तंगडीसकटच बाहेर काढतो अशा शब्दात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी हल्लाबोल केला आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

4 जून रोजी सर्वांनी छत्रपती संभाजीनगरकडे यावं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. कारण आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी घ्यायची नाही. मला उपोषण मागे घेण्याचा आग्रह कोणीही करू नका. करोडोंच्या संख्येने मराठा समाजाने एकत्र या. माझं एकचं स्वप्न आहे मराठ्यांची लेकरं मोठी झाली पाहिजेत, असं आवाहन केलं पाहिजे.

त्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळांची नियत चांगली नाही. तुला फक्त खायची सवय लागली आहे. ओबीसी महामंडळ 80 टक्के तुम्ही खाल्लं आहे. तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. तरी त्यांचाच मराठा आरक्षणाला विरोध आहे, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.

“धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण कसं मिळत नाही तेच पाहतो”

त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी धनगर आणि मुस्लिम बांधवांच्या आरक्षणावर प्रश्न उपस्थित केला आहे. धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण कसं मिळत नाही तेच पाहतो सरकारला सुद्धा हे लक्षात आलं असेल की, हा जर असाच राहिला तर गोरगरीब मराठे, मुस्लिम, दलित 12 बलुतेदार हे लोकं सत्ता घालवल्याशिवाय राहणार नाहीत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

सरकारचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला अटक करण्याचा प्लॅन आहे. माझ्याविरोधात एसआयटी नेमली आहे. शेवटी हे मला जेमध्ये टाकतील. माझ्यावर दररोज गुन्हे दाखल करून मला तडीपार करणार. मी तडीपार होऊन दुसऱ्या राज्यात जरी गेलो तरीही या राज्यातील मराठे त्या राज्यात बोलवून मोर्चे काढेन. मी जेलमध्ये सडेल पण मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

News Title – Manoj Jarange Patil Aggressive On Chhagan Bhujbal

महत्त्वाच्या बातम्या

‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन केला, तर सगळं सॉलव्ह होईल’; अग्रवालांच्या निकटवर्तीयांची अरेरावी

पुणे अपघात प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; नव्या दाव्याने खळबळ

दहावीचा निकाल लवकरच होणार जाहीर! अशाप्रकारे पाहा निकाल

तरुणांना स्वस्तात मस्त असलेल्या या बाईक्सची क्रेझ; जाणून घ्या किंमत

महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाकडे केली सर्वात मोठी मागणी