“आमचा धक्का लागतो म्हणता, मग आता..”; जरांगे पाटलांची सरकारला केली थेट विचारणा!

Manoj Jarange l आज दसऱ्याच्या मुहूर्तावर नारायण गडावर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला आहे. या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांवर आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिली डेडलाईन :

तसेच गेल्या 14 महिन्यात राज्य सरकारने मराठा समाजाची एकही मागणी मान्य केली नाही. मग एवढा द्वेष कशासाठी आहे? तसेच आता तब्बल 17 जातींचा ओबीसींमध्ये समावेश केला. परंतु त्यावेळी गोरगरीब ओबीसींचा तुम्ही विचार का केला नाही का? अशी विचारणा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला केली आहे.

याशिवाय मनोज जरांगे पाटील यांनी शड्डू ठोकत आरक्षण घेतल्याशिवाय माघार हटणार नसल्याचा इशारा देखील नारायणगड येथील दसरा मेळाव्यातून दिला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून राजकीय घोषणा करण्याचे टाळले आहे. तसेच आता आचारसंहिता लागेपर्यंत राज्य सरकारला डेडलाईन देखील दिली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील महत्वाची घोषणा करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

Manoj Jarange l ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही का? :

नारायणगड येथील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसी आरक्षणामध्ये आधीच भरपूर असल्याने मराठा समाजाने येऊ नका असं तुम्ही म्हणता. मग तुम्ही ओबीसीमध्ये 17 कशा घातल्या, तसेच आता ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही का? अशी विचारणा देखील त्यांनी केली आहे.

याशिवाय एकजण म्हणाला की, महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, मगच आम्ही मराठा समाजाला आरक्षण देतो. मग आता ओबीसीमध्ये 17 जाती घालताना तुम्ही महाविकास आघाडीकडून काही लिहून घेतले का? अशी थेट विचारणा करत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे.

News Title – Manoj Jarange Patil aginst on state goverment

महत्त्वाच्या बातम्या-

आता उलथापालथ करावीच लागेल, पर्यायच नाही; मनोज जरांगे कडाकडले

घरात सुख-समृद्धीसाठी आज राशीनुसार ‘या’ वस्तु खरेदी करा!

पंकजा मुंडे यांचं जरांगेंच्या मेळाव्याबाबत सर्वात मोठं विधान!

दसऱ्याच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; अन्यथा अडचणींमध्ये होईल वाढ

“..हीच वचपा काढण्याची, क्रांतीची वेळ”; राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन