Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभरात जात मराठा समाजाला मतदान करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. मराठ्यांनी लहान लेकरांकडे पाहावं आणि मतदान करावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. येत्या 4 जून रोजी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा मतदान करणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
मनोज जरांगे बेमुदत उपोषण करणार
जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) 4 जून रोजी निकालादिवशीच बेमुदत उपोषण करणार आहेत. आता अनेकांच्या नजरा या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाकडे लागल्या आहेत. बेमुदत उपोषणास्थळी गरजवंत मराठा बांधव एकत्रत येणार असल्याचं समजतंय.
माझ्या उपोषणामागे कोणीच नाही. गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे. या लढ्यात मराठा बांधव एकत्र येतील. या आंदोलनाचा सरकारला फायदा नाही. तसेच विरोधकांना देखील याचा फायदा नाही. याचा फायदा केवळ मराठा समाजाला आहे, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. मराठा समाजाने मतदानाचा अधिकार बजवावा. मराठ्यांनी आपली लेकरं डोळ्यासमोर ठेऊन मतदान करावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. तसेच माझा नाशिकच्या उमेदवाराला पाठिंबा नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मुंडे बंधु-भगिणींवर पलटवार
यावेळी बोलत असताना त्यांनी मुंडे बंधु-भगिणींवर हल्लाबोल केला. मनोज जरांगे पाटील यांना बीडमध्ये येऊ दिलं जाणार नसल्याची धमकी मुंडे देत असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला. तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचं आहे, हे लक्षात असु द्या, पंकजा मुंडे यांना आम्हीच मदतीला येणार आहोत. त्यांनी अपमानास्पद वागणूक देऊ नये असं, मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
News Title – Manoj Jarange Patil Announce About Maratha Reservation movement At Antarwal Sarati 4 June
महत्त्वाच्या बातम्या
पुणे हादरलं! बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षाच्या मुलाने भरधाव कारने दोघांना चिरडलं
जान्हवी कपूरने सांगितली धक्कादायक घटना; संपूर्ण बॉलिवूड हादरलं
‘अशा’ व्यक्तींपासून होईल तितकं दूर राहा; आयुष्यात खूप पुढे जाल
“सगळी पदं दिली, आणखी काय हवं होतं?”, शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर
“बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे तुम्हाला माहित नसेल”