आता तुम्ही सगळे पडणार, मनोज जरांगेंच खळबळजनक वक्तव्य

Manoj Jarange l विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित राहिला आहे. कारण आता मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला चांगलाच खडेबोल सुनावलं आहे. सध्या राज्यातील अनेक भागात दसरा मी;व होत असतानाच आता नारायणगडावर देखील दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याच्या तयारीपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

हरियाणा फॅक्टर महाराष्ट्रात कसा चालेल :

याशिवाय हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये जो फॅक्टर चालला आहे तो फॅक्टर महाराष्ट्रात कसा चालेल असा उलट सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला केला. याशिवाय येत्या विधानसभेला तुम्ही सगळे पडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

याशिवाय राज्यातील कुणबी मराठा एक कसा नाही आणि तुम्ही कोणाला नाटक शिकवता? तसेच भाजपामधील गोरगरीब मराठ्यांना कळत आहे की आपण इतकी हाडाचे काडं केली, तसेच रक्ताचे पाणी केले आणि यांना निवडून आले, त्यामुळे ते एका जातीचा निर्णय घेतात, मग मराठ्यांचे असे कसे होत नाही, आम्ही तुम्हाला निवडून दिले आहे. याशिवाय आमच्या लेकरांची वाटोळे करायला तुम्ही निवडून आले का? यासाठी तुमच्या हातात सत्ता दिली का? असा प्रश्न भाजपामधील मराठा विचारत आहे असं जरांगे म्हणाले आहेत.

Manoj Jarange l मराठा समाज उसळला :

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता मराठा समाज उसळला आहे. तसेच काल परवा धनगर समाज बाबतीत निर्णय झाला, तेव्हापासून मराठा समाज अजून खडबडून जागा झाला आहे. त्यामुळे आता मराठा समाज एकत्र येणार आहे, आणि ही शक्ती तुम्हाला येत्या विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे.

याशिवाय आता जातवाण मराठा घरी थांबत नाही. जातवाण मराठा आता कोणाच्या मेळाव्याला देखील जात नाही. कारण आता मराठ्यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे आता तुम्ही सगळे पडणार, तुम्ही किती शहाणे आहेत बघू आता असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

News Title :  Manoj Jarange Patil Attack on BJP 

महत्वाच्या बातम्या –

आज रंगणार भारत विरुद्ध बांगलादेश; कुठे व किती वाजता पाहता येणार

शनीचा राहुच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ 3 राशींच्या आर्थिक अडचणी वाढणार!

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय खलबतं?, रविकांत तुपकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला

भन्नाट फीचर्ससह BYD eMax 7 कार लाँच; जाणून घ्या किंमत

राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार!