Manoj Jarange l आज दसऱ्याच्या मुहूर्तावर नारायण गडावर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला आहे. या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच आपल्याला नाकारलं आहे आणि टार्गेट देखील केलं जातं आहे. तर सर्वजणांनी सावध व्हा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी या मेळाव्यातून दिला आहे.
… तर आता उलथापालथ करावीच लागणार :
यावेळी मनोज जरांगे पुढे म्हणाले की, जर आपल्याला न्याय मिळाला नाहीच तर तुमच्या लेकरांसाठी आणि तुमच्या समुदायासाठी आपल्याला या विधानसभेच्या वेळेस उलथापालथ करावीच लागणार आहे. तसेच आपल्याला त्याशिवाय काही पर्याय देखील नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
याशिवाय आपल्या नाकावर टिच्चून जर कुठले निर्णय घेतले जात असतील या राज्यातील समाजावर अशाप्रकारे अन्याय होणार असेल तर आपल्या लेकरांची आणि राज्यातील समाजाची शान वाढवण्यासाठी त्यांना गाडावच लागणार आहे असे ते म्हणाले आहेत.
Manoj Jarange l आता मात्र झुकायचे नाही; मनोज जरांगे पाटील :
तसेच जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी देखील पाहू शकत नाही. याशिवाय कोणतीही जहागिरदाराची औलाद येऊ दे, आता मात्र झुकायचे नाही. तसेच कोणालाही पाय लावायचे नाही. तर कोणावर अन्याय देखील करायचा नाही. पण मात्र समाजावर अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करायला सर्वांनी शिका. कारण आता स्वसंरक्षण करावंच लागणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं आहे.
तसेच मला तुमची एक वचन द्या, मला तुमच्याकडून जास्त काहीच नको. जर आपल्या राज्यातील जनतेवर अन्याय झाला आणि एकदा सांगितलं हेच करायचं तर तुम्हाला ते नक्की करावं लागेल असं मला तुम्ही वाचन द्या असं जरांगे पाटील म्हणले आहेत.
News Title – Manoj Jarange Patil attacked opposition
महत्त्वाच्या बातम्या-
घरात सुख-समृद्धीसाठी आज राशीनुसार ‘या’ वस्तु खरेदी करा!
पंकजा मुंडे यांचं जरांगेंच्या मेळाव्याबाबत सर्वात मोठं विधान!
दसऱ्याच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; अन्यथा अडचणींमध्ये होईल वाढ
“..हीच वचपा काढण्याची, क्रांतीची वेळ”; राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन