बीडमध्ये कोण निवडून येणार?; मनोज जरांगेंचं भाकीत

Manoj Jarange Patil

Manoj Jarange patil | मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीडच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीआधी मोठं भाष्य केलं आहे. माझ्या कुटुंबावर हल्ला करण्यात येणार असल्याचा सरकारचा कट असल्याचं मनोज जरांगे म्हणाले (Manoj Jarange Patil) आहेत. मराठा आणि ओबीसी वाद नाहीये. जर हा वाद असता तर त्यांची मुलगी दोनदा खासदार झाली नसती. धनंजय मुंडे आमदार झाले नसते. मुंडे कुटुंबियांना पिढ्या न् पिढ्या निवडून देण्यात येत असल्याचं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सांगितलं आहे. याचपार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मला भावनिक करून मागे सरकवण्याचा सरकारचा डाव असल्याचं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

भावनिक करून मला मागे खेचण्याचं काम सरकार करत आहे. माझ्या बलिदानाने जर सरकारचं भलं होणार असेल तर मला आधी सरकारने जेलमध्ये टाकावं. मी जेलमध्ये जाण्यास तयार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. राज्यात प्रत्येक ठिकाणी निवडणुकीची भीती नसती तर बारामतीवरून अंतरवालीला हेलिकॉप्टर आलं नसतं.

मराठा आणि ओबीसीमध्ये वाद नाही. जर तसं काही असतं तर माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले नसते. त्यांच्या मुलीला दोन वेळा खासदार आणि पुतण्याला आमदार केलं नसतं, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी बीडचा राजकीय इतिहास सांगितला आहे.

मराठा आणि ओबीसी असा वाद असता तर मुंडेसाहेब निवडून आले नसते. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले नसते. नाईकसाहेब मुख्यमंत्री झाले नसते तर देवेंद्र फडणवीस तुम्ही देखील मुख्यमंत्री झाला नसता. ज्या मराठ्यांनी तुम्हाला गादीवर बसवलं त्यांच्याच लेकरांवर तुम्ही एसआयटी दाखल करत आहात. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना खडेबोल सुनावलं आहे.

“विजय हा ओबीसीचाच”

गेल्या काही दिवसांआधी पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाबाबत एक वक्तव्य केलं होतं. आता मनोज जरांगे पाटील यांनी त्यावर भाष्य केलं, पंकजा मुंडे यांनी काही दिवसांआधी मराठा आणि ओबीसी वाद असल्याचं म्हणाल्या होत्या, मात्र आम्ही कोणालाही विरोधक मानलं नाही. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना विरोधक कधीच मानलं नाही. मराठ्यांचा विरोध असल्याचं काही कारण नाही. बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यापैकी कोणीही उमेदवार निवडून आला तरीही विजय हा ओबीसीचा असेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मी कोणत्याही पक्षासोबत नाही. मी महाविकास आघाडी, महायुती किंवा अपक्ष उमेदवारासोबत नाही. मराठ्यांना ज्यांना पाडायचं आहे. त्यांना पाडू द्या. मात्र असं पाडा की पाच पिढ्या उठल्या नाही पाहिजेत असं पाडा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

News Title – Manoj jarange Patil Big Statement Before Beed Loksabha Election 2024

महत्त्वाच्या बातम्या

‘स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही, तुम्ही…’; बजरंग सोनवणेंनी केली अजित पवारांची बोलती बंद

“बडे नेते जेलमध्ये जाणार”; अरविंद केजरीवालांच्या दाव्यामुळे खळबळ

“नवनीत राणा चिप मेंटॅलिटीची बाई, कव्हरेज दिलं तर डान्सही करायला लागेल”

सलमानला विचारण्यात आला ऐश्वर्या रायबद्दलचा प्रश्न, सलमान म्हणाला…

पुण्यात राज ठाकरेंच्या सभेचा इम्पॅक्ट होणार, फतव्यामुळं मोहोळांचं पारडं जड

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .