Manoj Jarange Patil | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर मराठवाड्यात कामी आला आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांआधी जालन्यातील अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे पाटील यांचा ग्रामस्थांनी उपोषणासाठी विरोध केला होता. मात्र आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषणास सुरूवात केली आहे. दरम्यान त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं. जो मराठा समाजाला त्रास देणार त्याला विधानसभेत पाडणार म्हणजे पाडणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्याचा नेमका रोष हा राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात असल्याचं म्हटलं जातंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाचा फॅक्टर पाहायला मिळाला होता. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे यांचा भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंविरोधात विजय झाला. याठिकाणी मनोज जरांगे पाटील फॅक्टर ठरला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
राज्यात आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेचं वेध लागलं आहे. मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलत असताना राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचं नाव न घेता हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, काहीजण देशी पिऊन माझ्यावर टीका करतात. त्याच्या नेत्याने त्याला आवर घालावा. तुझा नेता परळीत कसा निवडून येतो हे बघतोच. ज्या जातीचा नेता मराठ्यांना त्रास देईल त्या जातीचा नेता विधानसभेला पाडणार. आमच्या लोकांना बीड माजलगाव, गेवराई बीडमध्ये मारहाण झाली. त्यांच्या नेत्याचे काम त्यांच्या जातीला आवाहन करावे, ते नेते परदेशात जाऊन झोपतात. तिला मी काय केलं, मी कोणाला म्हटलं होतं पाडा म्हणून?, असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पंकजा मुंडेंचं नाव न घेता हल्लाबोल केला.
“जातीवादाच्या नावाखाली मराठा तरूणांना मारहाण”
जातीवादाच्या नावाखाली मराठा तरूणांना मारहाण सुरू आहे. गेवराई तालुक्यात शेतात जात असताना तरूणांना मारहाण केली. एखाद्या पोराने स्टेटस ठेवलं म्हणून मराठा समाज विरोधात आहे असं नाही. कोणीतरी खोटं स्टेटस ठेवायचं आणि त्यानावाने मोर्चे काढायचे. बीडच्या मराठ्यांनी शांतता राखावी असं माझं सर्वांना आवाहन आहे, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.
बीड तालुक्यात महाजनवाडीत मराठा समाजाला त्यांनी खूप त्रास दिला. मतदान का केलं नाही म्हणून, काही दिवस सहन करा. हार-जीत होत असते मान्य करायची असे हल्ले करून ज्या जातीचे लोक मराठा समाजाला त्रास देतील त्यांना विधानसभेत पाडणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
दर्ग्यावर चादर चढवल्याप्रकरणी सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे म्हणाला, मी किती कट्टर हिंदू मला माहिती आहे. ज्याला ज्याच्या त्याच्या धर्माचा गर्व असला पाहिजे. मला माझ्या धर्माचा स्वाभिमान आहे. मला माझ्या धर्माचा स्वाभिमान असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
News Title – Manoj Jarange Patil Big Statement
महत्त्वाच्या बातम्या
शिंदेंच्या ‘या’ खासदाराला आला मंत्रिपदासाठी फोन, अजित पवारांचा गट अजून वेटिंगवर
मंत्रिपदाची हंडी फुटली!, महाराष्ट्रातील ‘या’ 5 नेत्यांना मंत्रिपदासाठी आले फोन
‘या’ राशीच्या व्यक्तींचं आज भाग्य उजळणार, नव्या संधी आयुष्य बदलतील
लहान मुलांमधील लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक; काय काळजी घ्याल?
राज्यात मॉन्सून दाखल, शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?, हवामान विभागाकडून महत्वाचा सल्ला