Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनावर आधारीत एक नाहीतर आता दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला सिनेमा हा ‘संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील’ असं त्याचं नाव आहे. तर दुसऱ्या सिनेमाचं नाव हे आम्ही जरांगे असं आहे. मध्यंतरी ‘संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील’ (Manoj Jarange Patil) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र सध्या लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता असल्याने सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही.
जरांगेंच्या जीवनावर आणखी एक सिनेमा
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर ‘आम्ही जरांगे’ नावाचा दुसरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा येत्या 14 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘आम्ही जरांगे’ या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर आम्ही जरांगे या सिनेमात मराठी अभिनेते मकरंद देशपांडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेत असणार आहेत.
नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित ‘आम्ही जरांगे-गरजवंत मराठ्यांचा लढा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 14 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
सिनेमात दिग्गज कलाकारांचा समावेश
या सिनेमात दिग्गजांचा भरणा आहे. मनोज जरांगे पाटील याची भूमिक अभिनेते मकरंद देशपांडे करणार आहेत. त्यांच्यासोबत अजय पूरकर, प्रसाद ओक, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे या कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
View this post on Instagram
आम्ही जरांगे या चित्रपटाची संकल्पना ही डॉ. मधुसूदन मगर यांची आहे. तर तर या चित्रपटाची पटकथा ही सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. तसेच संवाद हे सुरेश पंडित, संजय नवगिरे आणि किशोर गरड यांनी लिहिले आहेत. तसेच या चित्रपटासाठी हिंदीतील दिग्गज गायक सोनू निगम तसेच मराठी आणि बॉलिवूड गाजवलेले गायक अजय गोगावले, नकाश अझीझ, आदर्श शिंदे यांच्या सुमधूर सुरांनी चित्रपटाच्या गाणी स्वरबद्ध केली आहेत यात कसलीच शंका नसेल.
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं ते म्हणाले होते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून लढा देताना दिसत आहेत. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर ते निवडणुकीच्या निकालादिवशीच म्हणजेच 4 जून रोजी उपोषण करणार आहेत. यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. अशातच आता चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने विधानसभेला याचा फायदा मनोज जरांगेंना होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
News Title – Manoj Jarange Patil Biography On Amhi Jarange Upcoming Movie Will Release On 14 June
महत्त्वाच्या बातम्या
“अजय तावरे मला दारू आणायला सांगायचे, त्यांच्यामुळे..”; पुणे अपघातप्रकरणी नवी माहिती समोर
“आव्हाडांनी बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी, अन्यथा..”
जितेंद्र आव्हाडांनी चुकून फाडला बाबासाहेबांचा फोटो, राजकीय वातावरण तापलं
इटलीतील आलिशान क्रुझवर होणार अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा; पाहा PHOTO
नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं, शेतकऱ्याने ‘इतक्या’ लाखांना खरेदी केला बैल