“मृत्यू नंतर माझं..”; मनोज जरांगे यांची वाढदिवशी मोठी घोषणा

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आज 1 ऑगस्टरोजी वाढदिवस आहे. आज वाढदिवशी त्यांना राज्यभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अंतरवालीमध्ये मोठी गर्दी झाली आहे. नागरिक मोठ्या संख्येने त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. अशात जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

वाढदिवस हा आनंदाचा दिवस आहे. पण आज मी सांगतो की, मृत्यनंतर मी माझं देहदान करणार आहे, असं जरांगे म्हणाले आहेत. त्यांचं हे विधान आता चर्चेत आलं आहे. वाढदिवशी जरांगे यांनी ही घोषणा केली आहे.

वाढदिवशी मनोज जरांगे यांची घोषणा

“मृत्यनंतर मी माझं देहदान करण्याचं ठरवलं आहे. माझ्या मृत्यूनंतर शरिरातील अवयव कुणाच्या तरी कामी आले पाहिजेत. आपले शरीर कुणाच्या तरी कामी आले पाहिजे. माझं शरीर हे मी आजच समाजाला दान करत आहे. माझं आयुष्य समाजाला दिलंच आहे. आता शरीर पण दान करत आहे.”, असं मनोज जरांगे (Manoj Jarange)म्हणाले आहेत.

आज रात्री बारा वाजल्यापासून जरांगे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यांना पुष्पहार घालून, आतिषबाजी, डोल, ताशे वाजवत नागरिक जरांगे यांना शुभेच्छा देत आहेत.

जरांगेंना शुभेच्छा देण्यासाठी समर्थकांची गर्दी

इतकंच नाही तर, जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. मराठा समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आणि उत्स्फुर्तपणे या ठिकाणी रक्तदान केलं जात आहे. आज दिवसभर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह दिसून आला.

दरम्यान, जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यांनी सरकारला यावर तातडीने (Manoj Jarange)निर्णय घ्यावा, असं आवाहन केलं आहे. तसेच आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली आहे.

News Title-  Manoj Jarange Patil Birthday Today

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राच्या सुपुत्राची ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी; भारताला तिसरं पदक

मुंबईकरांनो काळजी घ्या! डेंग्यू, मलेरियासह ‘या’ आजारांचा धोका वाढला

पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत मिळणार मोठी जबाबदारी?

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ