Manoj Jarange Patil | मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत आंदोलन आणि उपोषण करत आहेत. मराठा समाजाच्या सगेसोयरे अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण केलं आहे. मात्र आता त्यांनी उपोषण स्थगित केलं आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपल्या उपोषणाला स्थगित केलं आहे. 13 ऑगस्टपर्यंत मी सरकारला वेळ देतो, त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी यावेळी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला स्थगित केलंय. त्यांनी नुकत्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. मला रात्री हात पाय धरून सलाईन लावत असतील, तर दुपारी आपण उपोषण स्थगित करू. कारण सलाईन लावल्याने आता उपोषणाला अर्थ नाही, असं जरांगे म्हणाले आहेत.
येत्या 13 ऑगस्टपर्यंत सरकारला मी सरकारला पुन्हा वेळ देतो. 13 ऑगस्टपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्या. सरकारच्या ज्या खुर्चीत जीव आहे, ती खुर्ची ओढण्यासाठी मला तयारी करायची असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
“मी आत गेलो तरी भाजपची एकही सीट आली नाही पाहिजे”
मी झुकत नाही. जेलमध्ये जायला तयार आहे. मला आता जेलमध्ये टाका. मला आत (तुरूंगात) टाकून देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक लढवायची आहे. पण मी आत गेलो तरी भाजपची एकही सीट आली नाही पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
त्यानंतर पुढे ते म्हणाले की, मराठ्यांनी भाजपसोबत राहू नका. ज्यावेळी मी मेलो त्यानंतर हे जेव्हा पडततील तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती लाभेल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
News Title – Manoj Jarange Patil called off the fast
महत्त्वाच्या बातम्या
“माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील”, अजितदादा गटातील आमदाराच्या मुलाचं मोठं वक्तव्य
काळजी घ्या! ‘या’ भागांत पावसाचा जोर वाढणार, रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी
“तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतील लायकी…”; रोहित पवारांचा हल्लाबोल
गुडन्यूज! बजेटनंतर सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त, खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी
“बजेट देशाचं की बिहार-आंध्र प्रदेशचं?”; अमोल कोल्हेंची संतप्त प्रतिक्रिया