मोठी बातमी! मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली

Manoj Jarange

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यांना संभाजीनगरच्या गॅलेक्सी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. अनेकांचं लक्ष हे लोकसभा निवडणुकीकडे लागलं असल्याचं पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात सभांचा सपाटा लावला होता मात्र आता त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी मराठा आरक्षणासाठी विराट सभा घेणार होते मात्र मराठवाड्यात पाण्याची समस्या असल्याने आता ते इतर कोणती तारीख निवडतील हे पाहणं गरजेचं आहे. याआधी देखील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आजारी होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी उपोषण केलं होतं. त्यावेळी देखील उपोषणास्थळी डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीतबाबत चिंता व्यक्त केली होती.

सध्या उष्णतेचा चटका बसताना दिसत आहे. अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. उष्मघाताने नको नको केलंय. यामुळे देखील अनेकांना उष्मघाताने त्रास होताना दिसत आहे. काही दिवसांआधी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना उष्मघाताने त्रास झाला होता. त्यांना संभाजीनगर गॅलेक्सी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. आता देखील त्यांना गॅलेक्सी रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

मनोज जरांगे यांची प्रकृती स्थिर

दरम्यान मनोज जरांगे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. ते लवकर बरे होतील असं सांगण्यात आलं आहे. मात्र त्यांना डिस्चार्ज कधी दिला जाईल याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समोर आली नाही.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी मुंडे बंधु-भगिनीला इशारा दिल्याची माहिती आता समोर आली आहे. “मलाही आता धमक्या येत आहेत. तुझ्याकडे बघून घेऊ. तुला जीवे मारू, असं म्हटलं जात आहे. मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही,” असं देखील म्हटलं जात आहे. “मुंडे भाऊ-बहिणीने जरीही बीडमध्ये येऊ दिलं नाहीतर त्यांनीही लक्षात ठेवावं की त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचं आहे,” असं म्हणत मनोज जरांगे यांनी इशारा दिला.

मी माझ्या समाजासाठी बलिदान देण्यासाठी तयार आहे. माझी लढाई माझ्या समाजासाठी आहे. मुंडे कार्यकर्त्यांना भडकवण्याचं काम करताना दिसत असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

News Title – Manoj Jarange Patil Health Update

महत्त्वाच्या बातम्या

“मोदींनी पराभव स्वीकारावा, भाजपला फक्त..”; लोकसभेच्या निकालाबाबत ‘या’ नेत्याचा मोठा दावा

अजित पवारांचं टेन्शन वाढलं, बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार होणार लढत?

मोठी बातमी! ‘या’ तारखेला लागणार बारावीच्या निकाल?; बोर्डाकडून महत्वाची अपडेट

“माझ्याकडून काही चुका…”; मुलगा सैफबद्दल असं का म्हणाल्या शर्मिला टागोर?

राखीची तब्येत नाजूक, ‘या’ आजाराशी करतेय सामना?; एक्स नवऱ्याकडून खुलासा

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .