मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक, उपोषण थांबवण्यासाठी शरद पवारांचं मोठं पाऊल

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी उपोषण करणार असल्याचा दावा केला होता. मात्र उपोषणाला मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांनी नकार दिला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 8 जून रोजी उपोषणाला सुरूवात केली होती. मात्र आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आंदोलन आणि उपोषण करत आहेत. मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण देण्यासाठी धोरण राबवलं. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीत सामावून घेण्याबाबतची मागणी लावून धरली आहे. मात्र आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणास सुरूवात केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक

सलग चार दिवस उपोषण केल्याने आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. आता डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे.

उपोषण थांबवण्यासाठी शरद पवारांचं मोठं पाऊल

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज आपली ठोस भूमिका स्पष्ट करणार आहे. सकल मराठा समाजापुढे राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार साकडं घालणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महाविकास आघाडीचं नेतृत्व हे शरद पवारांनी केलं आहे. तसेच सर्व पक्षीय आमदार, खासदारांचं नेतृत्व करत मराठा समाजाला न्याय देत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन थांबवण्यासाठी मागणी करण्याची शक्यता आहे. आता सकल मराठा समाज नेमकी काय भूमिका मांडणार हे पाहणं गरजेचं आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना धक्का दिला. त्यांना असं पाडा की त्यांच्या पाच पिढ्या उठल्या नाही पाहिजे, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं होतं. त्याच वक्तव्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला असल्याचं समोर आलं.

News Title – Manoj Jarange Patil Health Update

महत्त्वाच्या बातम्या

“गोड बोलून माझा काटा काढण्याचा..”; मनोज जरांगेंचा अत्यंत गंभीर आरोप

शरद पवारांचं नाव घेत अजित पवार भावूक, म्हणाले…

अजित ‘दादा’ धोक्यात!, शरद पवारांकडे पोहोचलेल्या कार्यकर्त्यांची मोठी मागणी

अब्दूला लग्नापेक्षाही ती गोष्ट फार महत्वाची; अब्दू रोजिकने लग्न पुढे ढकलण्यामागे हे आहे कारण

पैसे तयार ठेवा, या भन्नाट फीचर्ससह इलेक्ट्रिक कार लाँच होणार