मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाचा आज तिसरा दिवस, सरकारच्या भूमिकेकडं सर्वांचंच लक्ष

Manoj Jarange Patil Health | मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. त्यांचा उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणास्थळी वैद्यकीय पथक आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या सगेसोयऱ्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करताना दिसत आहेत. (Manoj Jarange Patil Health)

राज्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून ओबीसी प्रवर्गातून सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहेत. मात्र ओबीसी नेते याला विरोध करत आहेत. यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचा जरांगे फॅक्ट कामाला आला. आता पुन्हा एकदा ते मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं जावं यासाठी लढत आहेत. (Manoj Jarange Patil Health)

वैद्यकीय पथक मनोज जरांगेंच्या तपासणीसाठी दाखल

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेवरून मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. सरकारकडूनही जरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं गेलं. दरम्यान मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे आंदोलन आणि उपोषण करताना दिसत आहेत. यामुळे आता वैद्यकीय पथक त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती खालवली आहे. (Manoj Jarange Patil Health)

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सामावून घेण्याबाबत सरकारकडे मागणी होती. त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. आरक्षणाची अंतिम तारीख गेल्याने मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. 20 जुलैपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं. (Manoj Jarange Patil Health)

मनोज जरांगेंचं पाचव्यांदा आंदोलन

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल पाचव्यांदा आंदोलन केलं आहे.  29 ऑगस्टला बैठक घेऊन 288 आमदार पाडायचे की ठेवायचे याबाबत ठरवू, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. यावेळी आपल्याला मतदारसंघनिहाय काम करायचं असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

News Title – Manoj Jarange Patil Health Update

महत्त्वाच्या बातम्या

गर्भवती महिलेसोबत घडलं असं काही..; व्हिडीओ बघून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल!

मुंबईकरांनो समुद्र किनारी जाऊ नका! मुंबई पोलिसांकडून मोठं आवाहन

इंडियन रेल्वेकडून बंपर भरती, दहावी पास तरुणही करू शकतात अर्ज!

पतीसोबत कट रचून महिलेने बॉयफ्रेंडची केली हत्या, नंतर मृतदेह..; धक्कादायक प्रकाराने पोलिसही हैराण

“घटस्फोटानंतर मी खूप आनंदी आहे, मला…”; आमिर खानच्या एक्स पत्नीने अखेर मौन सोडलं