जरांगे पाटलांची प्रकृती खुपचं ढासळली; सरकार काय पाऊल उचलणार?

Manoj Jarange

Manoj Jarange l राज्यात विधानसभा निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मात्र आज मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून जरांगेंना कोणता प्रतिसाद मिळतोय का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जरांगे पाटलांची प्रकृती खालावली :

मराठा आरक्षणांतर्गत सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करुन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान आज त्यांची प्रकृती खुपचं खालावली आहे. जरांगेंना आज चालणं देखील मुश्कील झालं आहे. कारण आज ते सहकाऱ्यांचा आधार घेत चालताना दिसत आहेत. याशिवाय मनोज जरांगे यांना थकवा देखील जाणवतोय. ते स्टेज वरून खाली उतरताना अचानकपणे ते खाली बसले आहेत.

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी देखील खालावली होती. मात्र तिसऱ्या दिवशी त्यांची शुगर लेवल ही कमी झाली होती. याशिवाय त्यांना थकवा देखील जाणवत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले होते.

Manoj Jarange l जरांगे पाटलांच्या मागण्या कोणत्या? :

याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वैद्यकीय पथकाने आज मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी केली होती. यावेळी त्यांना उपचार घेण्याची विनंती देखील केली होती. मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास पूर्णपणे नकार दिला असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी सांगितले आहे. मात्र आता या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार बैठक घेऊन नेमकं काय ठोस पाऊल उचलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

– राज्य सरकारने सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.
– लवकरात लवकर हैदराबाद गॅझेट लागू करावे.
– तसेच सातारा गॅझेट लागू करावे.
– बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करावे.
– याशिवाय मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत.

News Title : Manoj Jarange Patil health update

महत्वाच्या बातम्या –

घरच्या घरी बनवा ‘हा’ फेसवॉश; आठ दिवसात मिळेल कोरियन ग्लास स्कीन

‘या’ प्रसिद्ध गायिकेनं घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण ऐकून म्युझिक इंडस्ट्री हादरली!

खासगी आयुष्याबदल तृप्ती डिमरीचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाली ‘कोणत्या धंद्यात…’

पितृपक्षात पूर्वज ‘या’ चार रूपात येतात, चुकूनही त्यांचा अपमान करू नका

खुशखबर! जिओकडून ग्राहकांना मिळणार सर्वात मोठं गिफ्ट

 

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .