उपोषण स्थगित केल्यानंतर अंतरवाली सराटीतून मोठी बातमी समोर!

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी नुकतंच उपोषण स्थगित केलं आहे. सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन दिल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं. याआधी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत सरकारकडे मागणी केली होती. मात्र सरकारने मराठा समाजाला वैयक्तिक आरक्षण देण्याबाबत हिरवा कंदील दाखवला होता. मात्र सरकारचा निर्णय हा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना माहिती नव्हता.

शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया

अशातच आता भाजपचे नेते शंभूराज देसाईंनी यावर भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषणाला स्थगित केलं आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत आश्वासन दिल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान आज शिवसेना नेते संजय शिरसाट देखील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा निरोप घेऊन जाणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान आता उपोषण स्थगित करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी सरकारकडे मागणी केली होती. मध्यंतरी आचारसंहितेमुळे मराठा समाजाला उपोषण करता आलं नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं नाही. मात्र आता 8 जून रोजी पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी काल परवा सरकारने मराठा समाजाच्या सगेसोयरे मागणीला आश्वासन दिलं.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या जागा निवडून दिल्याचं बोललं जातंय. त्यांना असं पाडा की पाच पिढ्या त्यांच्या उठू नये, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. त्याचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे.

मराठवाड्यात जरांगे फॅक्टर

त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीला देखील उभे राहतील अशी शक्यता नाकारता येणार नाही. त्यांनी केलेलं विधान हे सध्या चर्चेत आहे. आता लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टर कामी आला. त्याचप्रमाणे आता देखील विधानसभेत जरांगे फॅक्टर कामी येणार का ही येणारी वेळ सांगेल.

News Title – Manoj Jarange Patil Hunger Strike Big News Update From Antarwali Sarati

महत्त्वाच्या बातम्या

“भुजबळांची भाजपसोबत जाण्याची इच्छाच नव्हती, पण..”; ‘या’ नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

मोठी बातमी! भाजप नेत्याच्या घरात उभी फूट; वहिनींच्या मतदारसंघावर दिराचा दावा

‘दारु पीऊन तो धिंगाणा आणि शिवीगाळ…’, Aishwarya Rai ने केला मोठा गौप्यस्फोट

समृद्धी महामार्गाची वर्षभरातच दयनीय अवस्था, पुलाला मोठं भगदाड पडल्याने 3 दिवसांत 4 अपघात

“हारकर जितने वाले को बाजीगर कहते है”, सुनेत्रा पवारांच्या बॅनरबाजीची जोरदार चर्चा