जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती, आमदार, खासदार जरांगेंच्या भेटीला

Manoj Jarange Patil | लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी 8 जून रोजी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. उपोषणामुळे मनोज जरांगेंची (Manoj Jarange Patil) तब्येत खालावली. यामुळे उपोषणस्थळी डॉक्टरांनी धाव घेतली. मात्र जरांगेंनी डॉक्टरांना तपासणी करण्यासाठी विरोध केला आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली. मनोज जरांगे पाटील यांचा बीपी आणि शुगर डाऊन झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारमधील कोणत्याही नेत्याने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची अद्यापही भेट घेतलेली नाही. मनोज जरांगे पाटील यांना आतापर्यंत काही आमदार आणि काही खासदार यांनी भेट दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil यांनी सगेसोयरे अंमलबजावणीसाठी सरकारकडे मागणी केली आहे. ओबीसी समाजात मराठा समाजात सामावून घेऊन आरक्षण द्यावं, अशी मनोज जरांगे पाटील यांची सरकारकडे मागणी आहे. याचपार्श्वभूमीवर त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा उपोषणास सुरूवात केली आहे.

मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. उपोषण करत आहेत. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले जात होते. यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणाला विरोध केला जात होता. मात्र त्यांनी पुन्हा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील हे अमरण उपोषणासाठी ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यापूर्वी 3 खासदार आणि दोन आमदार भेटून गेले आहेत.

उपोषणाआधी भेटायला आलेले नेते

उपोषणाआधी मनोज जरांगे पाटील यांना काही नेते भेटायला आले होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते. तसेच परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते. तर विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील अहमदपूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाआधी भेटून गेले आहेत.

उपोषणादरम्यान मनोज जरांगेंची भेट

उपोषणा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजी बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट घेतली. तसेच 9 जून रोजी संदिपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. तसेच 10 जून रोजी जालन्याचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे.

News Title – Manoj Jarange Patil Hunger Strike For Maratha Reservation Jalna Antarwali Sarati Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

“लोक माझी लायकी विचारत होते, बीडच्या जनतेने माझी लायकी दाखवून दिली”

अखेर निलेश लंकेंनी इंग्रजी बोलून दाखवलीच; सुजय विखेंना सणसणीत टोला, पाहा Video

“स्वार्थी जगात आपली मैत्री दृष्ट लागण्यासारखी…”, प्रितम मुंडेंची रक्षा खडसेंसाठी भावनिक पोस्ट चर्चेत

“कंगना आणि मी पती-पत्नी सारखं..”; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन!