“मराठा आणि धनगर समाज यांच्यात…”; जरांगे पाटलांनी घेतली धनगर उपोषणकर्त्यांची भेट

Manoj Jarange Patil | मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाप्रमाणेच आता धनगर समाजाचे उपोषणकर्ते लातूर येथे उपोषण करताना दिसत आहेत. गेल्या 12 दिवसांपासून धनगर समाजाच्या नेत्यांनी लातूर येथे उपोषण केलं. त्या दोघांची प्रकृती आता खालावली आहे.

मनोज जरांगे धनगर उपोषणकर्त्यांच्या भेटीला

उपोषणाला बसलेल्या युवकांचं नाव हे चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर असं आहे. त्यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. याचपार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे धनगर उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी लातूर येथे गेले आहेत. त्याठिकाणी जाऊन त्यांनी पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आहे. त्यावेळी मराठा धनगर एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.

“मराठा आणि धनगर समाज यांच्यात वाद नाही”

गेल्या 12 दिवसांपासून धनगर युवकांनी उपोषण सुरू ठेवलं आहे. मात्र लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन हे गेल्या 12 दिवसांपासून लातूरमध्ये फिरकले नाहीत. त्यांच्यापर्यंत विषय गेला होता. तरीही ते आले नाहीत. अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांना कळताच त्यांनी स्पष्ट केलं. मी राजकारण करण्यासाठी आलो नाही. जर कोणी आमरण उपोषण करत असेल तर त्याच्या वेदना मला माहिती आहेत. मराठा आणि धनगर समाज यांच्यात वाद नाही. राजकारणी ते लावता असतात. हा विषय गंभीर आहे. गिरीश महाजन साहेबांनी याठिकाणी नक्कीच भेट द्यावी, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.

जो सत्याचा मार्ग आहे त्यात आम्ही आपल्या सोबत आहोत. समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी पुढे आलेच पाहिजे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आहेत. काही काळजी करू नका सर्व मराठी समाज हा तुमच्या मागे आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

राजकारणी ही जाती जातीच तेढ निर्माण करत असतात. आपण राजकारणी नाही. आपण आपल्या समाजासाठी त्यांच्या लेकरा बाळांसाठी काम करत असतो. धनगर समाजाच्या ज्या मागण्या आहेत. त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. त्याची पूर्तती ही मागील दहा वर्षांपासून झाली नसल्याचं मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.

News Title – Manoj Jarange Patil Meet With Dhangar Hunger Strike Latur Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

“..तरी मराठी इंडस्ट्री मूग गिळून गप्प का?”; वरळी हिट अँड रन प्रकरणी संजय राऊतांचा सवाल

‘तुमचा वेळ घ्या’ म्हणत हाॅट अंदाजात अभिनेत्रीचे फोटो होतायत व्हायरल!

अंबानींच्या कार्यक्रमात खाण्याच्या पदार्थात आढळलं असं काही, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

“जरांगेंनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना एकदाचं कळूनच जाईल”

आता मद्यधुंद होत गाडी चालवल्यास थेट लायसन्स होणार रद्द; ‘या’ शहरात घेण्यात आला मोठा निर्णय