Manoj Jarange l राज्यात कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. अशातच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी पुन्हा एकदा पुढच्या महिन्यात उपोषणाचं हत्यार उपसणार आहेत. मात्र पुढच्या महिन्यातील त्यांचं उपोषण हे अखेरचं उपोषण असणार आहे. म्हणजे जरांगे पाटील हे पुढील महिन्यात आरक्षणासाठी आरपारची लढाई करण्याच्या तयारीत आहेत. अशातच आता जरांगे पाटलांनी आरक्षण कोणामुळे मिळालं नाही याबाबतीत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण :
मनोज जरांगे पाटलांच्या पुढील महिन्यातील आंदोलनाकडे अवघ्या राज्यातील मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं आणि सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी या दोन मुद्द्यांवर त्यांचा यावेळी भर असणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मनोज जरांगे यांनी एक मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नांसोबतच त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावर देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यांच्याबद्दल असं विधान करणं पूर्णपणे चुकीचं आहे असं ते म्हणाले आहेत.
Manoj Jarange l मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केले धक्कादायक आरोप :
मनोज जरांगे पाटील हे धाराशिव दौऱ्यावर असता त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीसांमुळेच सग्यासोयऱ्यांचा मुद्दा कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे.
देवेंद्र फडणवीसचं सगेसोयऱ्यांचा मुद्दा मार्गी लागू देत नाही. कारण राज्यातील मंत्र्यांना देखील फडणवीस काम करू देत नाहीत. त्यामुळे सगेसोयऱ्याचा मुद्दा हा पेंडिंग आहे. पण फडणवीसांचं हे षडयंत्र आम्ही 2024च्या विधानसभा निवडणुकीत हाणून पाडू असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
News Title- Manoj Jarange Patil On Devendra Fadanvis
महत्त्वाच्या बातम्या –
बीएसएनएलच्या ‘या’ प्लॅननी उडवली Jio, Airtel ची झोप; कमी पैशात मिळणार बऱ्याच सेवा
तुम्ही लवकर उठता तो तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम; सुप्रियाताईंनी दादांच्या डायलॉगचा घेतला समाचार
महाविकास आघाडीला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात…; शिंदे गटाच्या नेत्याचं खळबळजनक विधान
अक्षय कुमारचे तब्बल ‘इतक्या’ अभिनेत्रींसोबत होतं अफेअर, हिने तर रंगेहातच पकडलं होतं?
महिलांनो तुमच्या सुरक्षेसाठी फोनमध्ये ‘हे’ Apps लगेच डाउनलोड करा; एका क्लिकवर मिळेल मदत