Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता आक्रमक भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीला आचारसंहिता लागू केली होती म्हणून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना उपोषणास स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 8 जून रोजी पुन्हा उपोषण करण्यास सुरूवात केली. मात्र त्यानंतर पुन्हा सरकारने एका महिन्याचा कालावधी दिला आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषणास स्थगिती दिली आहे.
“…तर त्याचे परिणाम वाईट होतील”
यानंतर आता जालन्यातील वडीगोद्री गावात ओबीसी समाजाचे नेते उपोषण करताना दिसत आहेत. ओबीसी समाजातून इतर समाजाला आरक्षण दिलं जाऊ नये यासाठी ओबीसी नेते उपोषण आणि आंदोलन करताना दिसत आहेत. यावर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी हल्लाबोल केला आहे. आता मराठा समाजाची फसवणूक कराल तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.
आज माध्यमांसोबत बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना धारेवर धरलं आहे. तुम्हाला आमचे वाटोळं करायचं आहे का?, असा सवाल त्यांनी केला. मग न्यायाधीश कशाला पाठवले. त्यावेळी सगळे सोयरे आणि सर्व विषयावर मार्गी लागतील असं सांगायचं, आम्हाला सगे सोयऱ्यांची जी व्याख्या दिली आहे त्याप्रमाणे आरक्षण हवं आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
“जर आरक्षण दिलं नाहीतर तुम्हाला संपवणार”
त्यानंतर ते म्हणाले की, तुम्ही कितीही फसवा मी मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देणार आहे. जर आरक्षण दिलं नाहीतर तुम्हाला संपवणार. हे तुम्ही पक्क ध्यानात ठेवा. तुम्ही गोड बोलून फसवता का? तुम्ही कार्यक्रम करता का? तुम्ही फसवायचे पण तुमचा कार्यक्रम होत नव्हता. यापुढे तुमचा कार्यक्रम होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
त्यानंतर त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं भाष्य केलं. आम्ही दोन टप्प्यात पाहणी केली. त्यामध्ये आम्ही मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात चाचपणी केली आहे. सरकार जर असंच करत राहिले तर 288 जागा पाडायच्या की उभे करायच्या याचा आम्हाला विचार करावा लागेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
पहिल्या टप्प्यात 24 विधानसभा आणि दुसऱ्या टप्प्यात 43 विधानसभा चाचणी झाली असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. कोणी जर तुम्हाला फसवलं तर त्यांना आम्ही कायमचं घरी पाठवू, असा इशारा त्यांनी दिला.
News Title – Manoj Jarange Patil On Girish Mahajan About Maratha reservation
महत्त्वाच्या बातम्या
केंद्र सरकार पंकजा मुंडे संदर्भात ‘हा’ मोठा निर्णय घेणार!
पावसाळ्यात होणाऱ्या केसगळतीमुळे त्रस्त आहात?; करा ‘हा’ उपाय
अदिती तटकरे होणार ‘या’ जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री
विधानसभेपुर्वी शिंदे सरकार महिलांना देणार मोठं गिफ्ट?, थेट बँक खात्यावर पैसे..
ग्राहकांना झटका! सोन्याचे भाव पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर