Manoj Jarange Patil | राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. तसेच पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये इतरांची नावं देखील चर्चेत होती. पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोखले यांची नावं भाजपने जाहीर केली आहेत. यानंतर आता मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा समाजाच्या सगेसोयरे अंमलबजावणीसाठी लढत आहेत. ते या पार्श्वभूमीवर नेहमी चर्चा करताना दिसत आहेत. त्यांनी पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडेंना आमचा कसलाही विरोध नाही. याआधी देखील आम्ही कसलाच विरोध केला नाही. मात्र त्यांनी आम्हाला विरोधक मानलं असल्याचं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? :
पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली ही चांगली गोष्ट आहे. आम्ही नाही म्हणाल्याने पंकजा मुंडेंना भाजप विधानपरिषदेवर घेणार नाही असं नाही…पंकजा मुंडेंना आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही. आम्ही यापूर्वी कधीही विरोध केला नाही. मात्र त्यांनीच आम्हाला विरोधक मानलं आहे. त्याला आम्ही काहीही करू शकत नाही. त्यांना पद मिळालं. मराठ्यांनी कधीही विरोध केला नाही, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.
पंकजा मुंडेंना आमदार करणं न करणं हा भाजपचा अंतर्गत विषय असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहे. मराठ्यांना काही देणं घेणं नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले. त्यांच्या समाजाचं मत परिवर्तन होत असेल तर नक्कीच कौतुक असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
कुणबी प्रमाणपत्रामुळे मुलं नोकरभरतीत जातात :
माझ्या समाजाचं नुकसान होतंय का? नुकसान होत असेल तर हे माझ्या समाजाला नक्कीच माहिती पाहिजे. कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. त्या ताईंविरोधात तर आम्ही एक शब्दही बोललो नाही. माझ्या समाजाचं चांगलं होतंय की वाईट होत आहे हे चांगलं माहिती आहे.
त्या प्रमाणपत्रामुळे मुलं नोकरभरतीत जाऊ लागले. शिक्षण घेऊ लागले. अधिकारी बनत आहेत. याचा फायदा झाला की नुकसान हे माझ्या समाजाला माहिती असेल. जे 70 वर्षात आरक्षण मिळालं नाही आता ते आरक्षण कुणबी प्रवर्गातून मिळायला लागलं आहे. विखुरलेला मराठा समाज आता एकत्र झालेला आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
News Title – Manoj Jarange Patil On Pankaja Munde About Candidancy MLC Election 2024
महत्त्वाच्या बातम्या
“हा माझा विजय तितकाच तुझाही विजय”, विराटची अनुष्कासाठी भावुक पोस्ट
मोठी बातमी! लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची थेट विधान परिषदेवर वर्णी
‘या’ भागात पावसाने घातलं थैमान, रस्त्यावर अचानक मगरी आल्याने भीतीचं वातावरण
राहुल गांधींचं हिंदुंबाबत धक्कादायक वक्तव्य; पंतप्रधान मोदींनी सुनावले खडेबोल
शत्रुघ्न सिन्हांची तब्येत बिघडली, प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती समोर!