Manoj Jarange Patil | राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवारआणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यात आज भेट झाली. ही भेट सिल्व्हर ओक येथे झाली असून छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर काही प्रश्न केले. आम्ही जरी मंत्री, मुख्यमंत्री झालो असलो तरी राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुमची ओळख आहे. तुम्हाला गावगाड्यातील गोष्टी माहिती असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. भेटीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांसोबत झालेल्या चर्चांवर भाष्य केलं. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात झालेल्या चर्चेवर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिलीये.
“जिथे जातात तिथेच ते XXX खातात”
कोणी कोणाची भेट घेतली हे मी काय सांगू शकतो. स्फोटक परिस्थिती त्यांनीच निर्माण केली आहे. ओबीसी नेत्यांना आपल्या हाताशी धरलं असून भुजबळांना ज्यांनी मोठं केलं त्यांनाच ते बेईमान झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी मंत्री केलं. तुरुंगात जाण्यापासून वाचवले. तरी त्यांच्या मागे भिकार बोलत होते. जिथे जातात तिथेच ते XXX खातात, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे.
शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं, मात्र त्यांचाच गेम हा भुजबळांनी वाजवला आहे. कोणत्याही जातीत अशी लोकं जन्माला येऊ नये. शरद पवार, अजित पवार आणि शिवसेना सर्वांचा त्यांनी गेम केला असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. असा माणूस पृथ्वीवर जन्माला आला. गोरगरीब ओबीसी, गोरगरीब मराठ्यांमध्ये भांडणं लावणारा माणूस होऊ नये, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.
भुजबळ शरद पवारांच्या भेटीला येणं म्हणजे सरकारचा गेम
शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीवर मनोज जरांगे म्हणाले की, हा सरकारचा गेम दिसतोय. ही सत्ताधाऱ्यांची चाल आहे असं मला वाटतंय. आजवर शरद पवारांना शह देणारा छगन भुजबळ अचानक कसा जातो? सरकारचा डाव आहे असं मला वाटतं, असा संशय जरांगेंनी व्यक्त केला.
सामान्य मराठा आणि ओबीसी गावागावात भावासारखे राहतात. आधी भुजबळ व्यवस्थित राहिला असता तर आता राहुल गांधी आणि मोदींकडे जाण्याची वेळ आली नसती. मी धनगर, ओबीसी आणि मुस्लिम यापैकी एकाही माणसाला दुखावलं नाही. अशातच आता छगन भुजबळ मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणत असल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
News Title – Manoj Jarange Patil Reaction After Sharad pawar And Chhagan Bhujbal Meeting
महत्त्वाच्या बातम्या
“पदव्या घेऊन काय होणार नाही, पंक्चरचे दुकान टाका”; भाजप आमदाराचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
“आम्ही मंत्री, मुख्यमंत्री झालो म्हणजे तुमच्यापेक्षा..”; छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
तब्बल 46 वर्षांनी जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचं कुलूप उघडलं; धन बघून थक्क व्हाल
छगन भुजबळ मोठी भूमिका घेण्याच्या तयारीत?, शरद पवारांनंतर राहुल गांधींनाही भेटणार?
पुणेकरांची चिंता वाढली! झिका व्हायरसनंतर आता ‘या’ रोगाचा शिरकाव