साताऱ्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Health) यांची शांतता रॅली आयोजित करण्यात आली होती. या शांतता रॅलीदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली आहे. शांतता रॅलीमध्ये मराठा बांधवाना संबोधित करत असताना घडला प्रकार, यामुळे मराठा आंदोलनाला मोठा फटका बसला आहे.
शांतता रॅलीला संबोधित करत असताना मनोज जरांगे यांना भर व्यासपीठावरच अचानक भोवळ आली. मनोज जरांगे पाटील व्यासपीठावर भाषण करत असताना अचानक खाली बसले. मनोज जरांगे पाटलांना उपचार घेण्याची गरज असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. खाली आपण मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली त्यावेळेचा फोटो पाहू शकता.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली तेव्हाचा फोटो-

साताऱ्यात नेमकं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. सध्या ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. साताऱ्यात त्यांच्या शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांची तब्येत अचानकच बिघडली, तब्येत बिघडल्याने जरांगे पाटील यांना व्यासपीठावरुन तात्काळ खाली नेण्यात आलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं,
व्यासपीठावर बोलण्यासाठी आलेल्या जरांगे पाटील यांच्या अंगाचा थरकाप उडला होता, त्यांना नीट उभं सुद्धा राहता येत नव्हतं. उपस्थितांनी त्यांना आधार दिल्याने ते पडता पडता वाचले. त्यांना तात्काळ व्यासपीठावर खाली उतरवण्यात आलं. यामुळे काही काळ मराठा आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं. काही झालं कुणाला लवकर लक्षात आलं नाही, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.
मनोज जरांगे पाटील यांना त्रास का झाला?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करत आहेत. अनेकदा त्यांनी उपोषणाचं हत्यार उपासलं आहे. सातत्याने उपोषण केल्यामुळे त्यांच्या शरीरावर याचा वाईट परिणाम झाल्यांचं म्हटलं जात आहे. (Manoj Jarange Patil Health) उपोषणासोबतच मनोज जरांगे पाटील दौऱ्यावर आहेत. ते गेल्या काही महिन्यांपासून रॅली तसेच सभा घेत आहेत. त्यामुळे धावपळ होऊन त्याचाही परिणाम त्यांच्या शरीरावर झाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. उपोषणानंतर त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. पण ते मराठा आरक्षणासाठी दौरा सुरुच ठेवणार असल्याचं त्यांनी याआधीही म्हटलं होतं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यात खंड पडेल, असं तरी सध्याच्या घडीला दिसत नाही, मात्र मराठा कार्यकर्ते मात्र त्यांच्या तब्येची चिंता करताना दिसत आहेत.
News Title: Manoj Jarange Patil Satara Rally Heath update
महत्त्वाच्या बातम्या-
दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी; विनाशुल्क भरता येणार अर्ज
विजय कदम यांच प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत होतं मोठं कनेक्शन!
“अजित पवार कधीच जातीच्या राजकारणात पडले नाहीत”; राज ठाकरेंचं वक्तव्य
“माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील ते कळणारही..”; राज ठाकरेंचा इशारा
कमी बजेटमध्ये लाँच झाली ‘ही’ भन्नाट कार; जाणून घ्या किंमत