Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहेत. तसेच सगेसोयरेंची अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे. यामुळे ओबीसी आक्रमक झाले आहेत. अशातच आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर भाष्य केलं आहे. मुस्लिम समाजालाही ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.
जर मुस्लिम समाजातील कुटुंबांच्या नोंदी जर कुणबी निघत असतील तर मुस्लिमांना आता ओबीसीतून आरक्षण द्यावं, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणत आहेत. सरकार आरक्षण कसं देत नाही तेच बघतो, असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. माध्यमांसोबत बोलत असताना त्यांनी वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
ज्यावेळी ओबीसींना 1967 मध्ये आरक्षण दिलं. तेव्हा त्यात 180 जाती होत्या. त्यावेळी 83 क्रमांकावर कुणबी ही जात आहे. त्यानंतर या जातीच्या पोटजाती यात समावेश करण्यात आला. मग यात पोट जातींचा समावेश का करण्यात आला नाही. मग इतर जातीचा समावेश करण्यात आला नाही? जर यात मराठा समाजाला घेतलं नाही, तर मग इतर जाती कोणत्या आधारावर घेतल्या. त्याचं उत्तर सरकारने घ्यावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“…तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण द्यावं”
सरकारी नोंदी या मारवाडी, ब्राह्मण, लिंगायत आणि मुस्लिमांच्या सुद्धा निघाल्या आहेत. तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण द्यावं, जर बागवाणचा समावेश जर शेती करतो म्हणून त्यांचा समावेश हा ओबीसींच्या यादीत केला असेल तर मुस्लीम समाजदेखील शेती करतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जर माळी समाजाला व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं असेल, तर आम्हीही शेती करतो. मग आमचा समावेश या यादीत का नाही? याची उत्तरं आम्हाला हवं आहे, असंही ते म्हणाले.
आता ओबीसींवर कोणताही अन्याय होता कामा नये. आता सरकारने कायद्याने बोलावं, पाशा पटेल यांची सुद्धा कुणबी नोंद निघाली आहे. सर मुस्लिमांचं कुणबी नोंदी निघत असतील तर मुस्लिमांनाही आरक्षण द्यावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
News Title – Manoj Jarange Patil Statement About Muslim Reservation
महत्त्वाच्या बातम्या
“माझ्या पुतण्यानं मद्यप्राशन…”; आमदार मोहिते पाटलांचा मोठा दावा
‘या’ 3 राशींचं नशीब पालटणार; मिळणार बक्कळ पैसा
पुण्यात आणखी एक भीषण अपघात, आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
लग्नासाठी सोनाक्षी सिन्हा हिंदू धर्म सोडणार?, होणाऱ्या सासऱ्याने स्पष्टच सांगितलं
“जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद…”; छगन भुजबळांचं जोरदार भाषण