Manoj jarange patil | मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) विरूद्ध ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bujbal) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये सामावून घेण्याबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. यास छगन भुजबळ यांचा विरोध आहे. आता या दोघांमधील वाद आज संपेल उद्या संपेल म्हणत म्हणत हा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
मनोज जरांगे पाटील हे सप्तशृंगी देवीच्या गडावर आशीर्वादासाठी गेले होते यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी भुजबळांवर टीका केली होती. भुजबळ यांचं वय झालं आहे. तो संपलेला माणूस आहे. त्यांनी जास्त ताण घेऊ नये नाहीतर जायचा एक दिवस टपकून, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यानंतर माध्यमांनी मनोज जरांगे यांना राजकारणात येणार का?, असा प्रश्न केल्यावर भुजबळ उत्तरले आहेत.
जरांगेंनी भुजबळांना सुनावलं
मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) हे सप्तशृंगी देवीच्या गडावर गेले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भुजबळांवर टीका केली. यानंतर माध्यमांनी मनोज जरांगे पाटील यांना राजकारणात तुम्ही येणार का?, असा सवाल केला. यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. “तो आपला मार्ग नाही. तो आपला अजेंडाही नाही. गोरगरीब जनतेला मी न्याय मिळवून देणार आहे,” असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. त्यांनी देवीकडे साकडं घालून सरकारला बुद्धी दे अशी देवाकडं मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील हे सप्तशृंगी गडावर जाऊन त्यांनी देवीकडं साकडं घातलं आहे. सरकारला 15 तारखेपर्यंत सबुुद्धी दे अशी देवाकडं प्रार्थना केली आहे. आणि शेतकरी दुष्काळामुळं अडचणीत आहे त्याला भरगोस मदत व्हावी, असं देवाकडं साकडं घातलं आहे.
यावेळी मनोज जरांगे यांनी “मराठा समाजातील तरूणांना शिकून मोठं व्हा. आता दोन कोटी मराठा बांधव मराठा आरक्षणामध्ये गेले आहेत. 57 लाख मराठा बांधवांचे कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडल्या आहेत. मी महिन्याआधीच सांगितलं होतं की आरक्षण मिळेपर्यंत भरती करू नका आणि केली तर जागा रिक्त ठेवा”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
सोशल मीडियाबाबत जरांगे पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांनी सोशल मीडियावर काही समाजबाधवांच्या तसेच सामाजिक आणि जातीवाद पसरवणाऱ्या प्रकरणावर आपली भावना व्यक्त केली आहे. मराठा समाज अनेक वर्षांतून एकत्र आला आहे. गैरसमज सोडून द्या. तुमच्या स्वार्थासाठी राजकारण नको, आपले मतभेद सोडून द्या, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
News Title – Manoj jarange patil vs Chhagan Bujbal marathi news
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, ‘या’ विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बदल
ठाकरे गटाला मोठा धक्का!, ‘हा’ आमदार शिंदे गटात जाणार?
“घोसाळकरांच्या हत्येची घटना धक्कादायक, पूर्वी अशा बातम्या फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशमधून यायच्या”
बांगलादेशमध्ये टीम इंडियावर दगडफेक! फायनलमध्ये गोंधळ, भारताचे विजेतेपद काढून घेतले