मनोज जरांगे पाटील यांचा सभेपूर्वी मोठा इशारा!

जालना | जालन्यातील अंतरवली सराटी गावात आरक्षणासाठी (Reservation) मराठा समाजातील लोक एकवटले आहेत. जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सभेला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला (Goverment) आरक्षणाच्या मुद्द्यावरून सूचक इशारा दिला आहे. 

आजपासून सरकारच्या हातात दहा दिवस आहेत. आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे. ते सरकारला द्यावंच लागेल. सरकारने भावना शून्य होई नये, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

ही गर्दी नाहीये. हा जमाव नाहीये. ही सभाही नाहीये. ही वेदना आहे. एका वेदनेतून लोक या ठिकाणी आले आहेत. स्वत:च्या लेकराचं भविष्य आणि अस्तित्व धोक्यात आलं आहे. एक टक्का हुकला तरी सुशिक्षित बेकार म्हणून मराठा तरुणाला घरात बसावं लागतंय. मग तो कितीही हुशार असला तरी त्याची संधी जाते. संधीच मिळत नसल्याने त्याचा नोकरीतील टक्का कमी झाला आहे. म्हणून मी सामान्य माणसाची लढाई लढत आहे, असं ते म्हणालेत.

आजपासून दहा दिवस हातात आहे. दहा दिवसात आरक्षण द्यायचं आहे. हा सुवर्ण क्षण आहे. या क्षणाला साक्षीदार व्हायचं आहे. एकही मराठा घरी राहणार नाही. पण सरकारने भावना शून्य होऊ नये. त्यांनी दहा दिवसात आरक्षण द्यावं, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय.

महत्त्वाच्या बातम्या-