Manoj Jarange l महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला आहे. यामध्ये महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी महायुतीत अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रीमंडळात डच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना देखील डावलण्यात आले आहे. यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच आता भुजबळ यांचं मंत्रिपद हुकल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज :
मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना डावलल्याने भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली आहे. यावेळी मी नाराज असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी काल नाशिकमध्ये मोठं आंदोलन केलं. तर आज जालन्यात देखील आंदोलन करण्यात आलं आहे.
Manoj Jarange l मनोज जरांगे काय म्हणाले? :
दरम्यान, छगन भुजबळ यांचं मंत्रिपद हुकल्यानंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का? घेतलं नाही, हा आमचा प्रश्नच नाही. तर आरक्षणाच्या मारेकऱ्याचंं आम्हाला काही देणं घेणं नाही. असं म्हणतं मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जास्त बोलणं टाळलं आहे.
मनोज जरांगे पूढे म्हणाले, महायुती सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा अशी अपेक्षा मनोज जरांगेंनी व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
News Title : Manoj Jarange Patils reaction on Chhagan Bhujbal ministership
महत्वाच्या बातम्या –
छगन भुजबळ अजितदादांची साथ सोडणार? भुजबळांचं सूचक विधान होतंय तुफान व्हायरल
“आपण बिहारच्या मार्गाने चाललोय”; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यानं नेतृत्वावर केला हल्ला
मंत्रिपदापासून वंचित असलेले भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?, थेट म्हणाले…
राज्यातील तब्बल 17 जिल्हे मंत्रिपदापासून वंचित; पाहा त्या जिल्ह्यांची यादी
“जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस..”; मंत्रीमंडळात डावलल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया