Manoj Jarange l राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहे. या अनुषंगाने आज मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.
मनोज जरांगे यांनी घेतली महत्वाची भूमिका :
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण यंदा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी देखील या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. कारण मनोज जरांगे यांनी ज्या ठिकाणी उमेदवार निवडूण येण्याची शक्यता आहे आता त्या ठिकाणी उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
याशिवाय ज्या भागात उमेदवार निवडणून येण्याची शक्यता कमी वाटते, तिथे जे उमेदवार मराठा समाजाच्या मागण्यांना समर्थन देतील त्या उमेदवाराला पाठिंबा देणार अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी आज मांडली आहे. त्यामुळे आता एकप्रकारे मनोज जरांगे हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
Manoj Jarange l मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले? :
आज मनोज जरांगे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. विधानसभेत समीकरण जुळणं फार आवश्यक आहे, परंतु अवघ्या एका जातीवर निवडणूक लढवल्या जात नाहीत. त्यामुळे तुम्ही इकडे गर्दी करू नका, तुम्ही इकडे गर्दी केली की मला काहीही काम सुचत नाही. तसेच मराठा, मुस्लिम, दलित यांनी एकत्र यायला पाहिजे, मग राज्यात शंभर टक्के परिवर्तन घडवून आणू शकतो.
तसेच आता समाज निर्णय प्रक्रियेत उभा राहणार आहे का? हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण 30 तारखेला दलित मुस्लिम मराठा यांचा काय निर्णय येतोय हे देखील बघणं महत्त्वाचं आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. याशिवाय राज्यात सध्या इतके भावी आमदार झालेत. पण मतदारसंघ देखील कमी पडत आहेत. त्यामुळे राज्यात आम्ही कोणालाही पाठिंबा दिला नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
News Title – Manoj Jarange Patil’s Reaction on Maharashtra Assembly Elections
महत्त्वाच्या बातम्या-
भाजप एकनाथ शिंदेंचा गेम करणार?; शिंदेंना बसू शकतो मोठा धक्का
जळगावात महायुतीत वादाची ठिणगी, शिंदेंच्या उमेदवाराला भाजपकडूनच आव्हान
शरद पवारांची मोठी खेळी; ‘या’ जागेवर महायुतीच्या ‘नाकी नऊ’ आणणार
युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवार भावूक; नेमकं काय म्हणाले?
वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरचे वडील ‘या’ भागातून निवडणूक लढवणार