“माझं डोकं पिसाळलं तर…”; मनोज जरांगे संतापले, पण कुणावर?

Manoj Jarange reaction on Santosh Deshmukh murder case

Manoj Jarange | बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं काल अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी मस्साजोग गावातील नागरिकांनी बीड-लातूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलकांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला हिंसक वळण मिळाले. यामुळे बीडमध्ये संतप्त नागरिकांनी एसटी बस देखील पेटवल्या. (Manoj Jarange)

या सर्व पार्श्वभूमीवर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी मस्साजोग गावाला भेट देत आंदोलकांशी संवाद साधला. आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, आम्ही सरकारी वकील देणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे, अशी माहिती जरांगे यांनी आंदोलकांना दिली.

“आता तर हत्या झाली आहे, ही परिसीमा आहे. माज करू नका हे खूप वाईट आहे. एकदा जर मराठे बिथरले तर समाज मोठा उठाव करेल. भविष्याचा तुम्ही विचार करा, जातीवाद होवू देवू नका, आम्ही जातीचा रंग दिलेला नाही. माझं डोकं पिसाळलं तर मी कोणाचं ऐकणार नाही.”, असा इशाराच मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे काल (10 डिसेंबर) अपहरण करण्यात आले होते. अपहरण करून त्यांची नंतर हत्या करण्यात आली व मृतदेह फेकून देण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच, याची सीआयडी चौकशी होणार असून कोणालाही सोडणार नाही असं बीडच्या पोलीस आयुक्तांनी म्हटलंय.

याच प्रकरणी बीडमध्ये काल तणाव निर्माण झाला होता. जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला. तसेच, या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. हत्या होऊनही आमचे लोक संयमात आहेत. भविष्याचा तुम्ही विचार करा, जातीवाद होवू देवू नका, असं जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत.

News Title –  Manoj Jarange reaction on Santosh Deshmukh murder case

महत्वाच्या बातम्या-

मोक्षदा एकादशीला भगवान विष्णू व लक्ष्मी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी!

मंत्रिमंडळात कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार? उदय सामंतांनी दिल उत्तर

असली उंदर पवारसाहेब… पडळकर- खोतांच्या जहरी टीकेला ‘या’ नेत्याचं प्रत्युत्तर

100 शकुनी मेल्यानंतर शरद पवार जन्माला…; पडळकरांची पवारांवर एकेरी टीका

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .