Manoj Jarange | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना आज पुण्यातून अटक करण्यात आली. या अटकेनंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे.
खंडणीच्या आणि हत्येच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींची सरकारने अजिबात हयगय करु नये. या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे. यामध्ये मोठं रॅकेट असल्याचं देखील जरांगे म्हणले. पुण्यातून सगळ्यांना पकडलं जातंय याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्याचं प्रचंड राजकीय पाठबळ आहे, अशी शंका देखील जरांगे यांनी व्यक्त केली.
काय म्हणाले मनोज जरांगे?
“आरोपीला संभाळण्यात यांना मोठेपणा वाटतो. हे कोण आहेत? यांना आरोपीला भाकरी द्यावीशी वाटते. आरोपीला संभाळतात. त्यांना ऐशोआराम देतात. या आरोपींनी अत्यंत क्रूरपणे कोणाच्या तरी लेकाचा, लेकीच्या बापाचा खून केलाय.सरकारने आता यांना पाठिशी घालू नये”, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले.
पुढे माध्यम प्रतिनिधींनी जरांगे यांना हे प्रकरण थंड करुन दाबण्याचा प्रयत्न होतोय का?, असा सवाल केला. त्यावर जरांगे म्हणाले की, “यांच्या बापाला थंड होत नाही. यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही मॅटर दाबू देणार नाही” तसेच गृहमंत्रालयाला एकच सांगणं आहे की, लपवून ठेवणाऱ्यांना सुद्धा सोडू नका. ते सुद्धा खुनाला जबाबदार आहेत. ज्यांची वाहन वापरली, ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. यांना धडा शिकवणं गरजेच आहे, असं जरांगे यांनी म्हटलंय.
सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक
दरम्यान, संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) याच्यासह सुधीर सांगळेला (Sudhir Sangle) पुण्यातून आज अटक करण्यात आली. इतके दिवस हे आरोपी फरार होते. मात्र, अजूनही एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार आहे. त्याच्या शोधासाठी आता विशेष पथक मागावर असल्याचं बोललं जातंय.
आतापर्यंत या प्रकरणात जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले(Sudarshan Ghule आणि सुधीर सांगळे या दोघांना देखील आज अटक करण्यात आली. आता तिसरा आरोपी देखील लवकरच अटकेत येण्याची शक्यता आहे. (Manoj Jarange)
News Title – Manoj Jarange reaction on Sudarshan Ghule arrest
महत्त्वाच्या बातम्या-
सुदर्शन घुले अन् सुधीर सांगळेच्या मागील 10 वर्षाच्या गुन्ह्यांची यादी समोर!
घुले अन् सांगळेचा ठावठिकाणा कसा लागला?, सरपंच हत्येमागील मास्टरमाईंड दुसराच?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टरला अटक, त्याचा नेमका रोल काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरण…; अखेर सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळल्या?
‘त्या’ लाडक्या बहीणींचे पैसे पुन्हा सरकारजमा; कारण…