Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं. मात्र, त्यांची तब्येत खूप खालावली होती. अशात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपलं उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला आता 13 ऑगस्ट पर्यंत वेळ दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासंबंधी त्यांनी मागणी केली आहे.
यावेळी जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. “देवेंद्र फडणवीस हे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना समोर करून काड्या करत आहेत”, असा आरोप जरांगे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे.
“दरेकरने कपाळावर कुंकू लावले तर, अतिशय सुंदर दिसेल, सखू सारखा दिसेल”, असा एकेरी उल्लेख करत जरांगे यांनी टीका केली आहे. तसंच “राज्य सरकारकडून कुणीच आलं नाही. सरकारकडे मंत्री उरले नाहीत. अनेक जण आले, आता पुन्हा कोणत्या तोंडाने जायचे हा विषय असेल. समाजाच्या दबावामुळे मी सलाईन घेतले”, असंही मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील म्हणाले आहेत.
“न्यायाधीश फडणवीसांचे नातेवाईक..”
पुढे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. आपल्या अटक वॉरंट बद्दल त्यांनी गंभीर दावा केला आहे. “न्याय, गृह विभाग फडवणीस यांच्याकडे आहे. हा देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे. न्यायाधीश हे फडवणीस यांचे नातेवाईक आहेत. मला जेल मध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते. मी कुठं अडकत नाही, म्हणून हा कट आहे.”, असा दावाच जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
“ईडीचे कित्येक वॉरंट कॅन्सल झाले आहेत आणि त्यामध्ये छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक यांचे नाव आहे. बाकीचे देव बाप्पा चांगले मग हे देव बाप्पा असे कसे?मला वॉरंट आले तरी मी जात नसतो, कोर्टाने पण फडवणीस यांचे ऐकणे सोडावे”, असं जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत.
‘मी मेलो तरी, माझ्या आत्म्याला शांती तेव्हाच मिळेल…’
पुढे ते म्हणाले की, “मी उद्या जेलमध्ये जायलाही तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांना कुठेच मी गठलो नाही, भाजपचे सरकार येणार नाही. मला आत टाकून फडवणीस यांना निवडणूक काढायची आहे. मी आत गेलो तर भाजपची एकही सीट आली नाही पाहिजे. भाजप सोबत मराठ्यांनी राहू नका. मी मेलो तरी, माझ्या आत्म्याला शांती तेव्हाच मिळेल, जेव्हा हे सर्व पडतील.”, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले.
News Title – Manoj Jarange Slam Devendra Fadnavis
महत्त्वाच्या बातम्या-
मनोज जरांगेंच्या आरक्षणाला स्थगिती, सरकारला ‘या’ तारखेपर्यंत दिला वेळ
“माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील”, अजितदादा गटातील आमदाराच्या मुलाचं मोठं वक्तव्य
काळजी घ्या! ‘या’ भागांत पावसाचा जोर वाढणार, रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी
“तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतील लायकी…”; रोहित पवारांचा हल्लाबोल
गुडन्यूज! बजेटनंतर सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त, खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी