Manoj Jarange l विधानसभा निवडणुकीत अवघे काही तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एक महत्वाचं आवाहन केलं आहे. या विधानसभेत मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा :
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा. तसेच आपल्या हाल- अपेष्टा देखील मराठा समाजाने डोळ्यासमोर ठेवा. त्यामुळे वेळेवर भावनिक होऊ नका. हा माझा नेता… हा माझा नेत्याचा मुलगा आणि त्याला मतदान करावंच लागेल असं न करता तुमचे कष्ट स्वतःच्या डोळ्यासमोर समोर ठेवा.
याशिवाय तुम्ही विचार नाही केला तर कधी मोठे होणार आहात. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे.
Manoj Jarange l मराठा समाजाला मनोज जरांगेंनी काय आवाहन केलं? :
पुढे जरांगे पाटील म्हणाले, श्रीमंत मराठे, नोकरी करणारे मराठे, उद्योजक असे अनेक लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी आपल्या मुलांना विचारा. त्यामुळे मी लोकसभा निवडणुकीला देखील सांगितले होते, कोणाला पाडायचे त्याला पाडा आणि कोणाला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. तसेच आता विधानसभा निवडणुकीत पण तेच सांगत आहे. मी कोणालाही पाठिंबा दिला नाही आणि माझी कुठेही टीम देखील पाठवली नाही. तर मी कोणत्याही मतदार संघात कोणालाही पाठिंबा दिला नाही असं मनोज जरांगे यांनी बोलून दाखवले आहे.
याशिवाय मराठा समाजाने एकजुटीने 100 टक्के मतदान करा. पण ज्याने आरक्षणाला विरोध केला आहे. त्यांना मात्र सोडू नका. कारण राजकारणापेक्षा मला आरक्षण सर्वात महत्वाचे आहे, आणि ते मी मिळवून देणारच आहे. त्यामुळे मराठा समाजाने संभ्रम ठेवू नये असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
News Title – Manoj Jarange Statement Vidhansabha Election
महत्त्वाच्या बातम्या-
विनोद तावडेंच्या डायरीत नेमकं काय लिहिलं?; हितेंद्र ठाकूरांच्या खुलाशाने खळबळ
एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला दिलं मोठं आश्वासन!
‘मला माफ करा, जाऊ द्या..’ पैसे वाटताना पकडताच तावडेंकडून विनवणी; विरारमध्ये नेमकं काय घडलं?
विनोद तावडेंनी 5 कोटी वाटले, माझ्याकडे डायरी..; विरारमध्ये बविआ-भाजपमध्ये मोठा राडा
एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला सर्वात मोठा झटका!