“सत्ता आणायला छत्रपती लागतात, पण..”; जरांगे पाटलांचा आता थेट PM मोदींवरच हल्लाबोल

Manoj Jarange Target PM Narendra Modi

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टीका करताना दिसून आले आहेत. त्यांनी भाजपवर आणि विशेषतः फडणवीस यांच्यावर बऱ्याचदा पातळी सोडून टीका केली आहे. मात्र, आता तर जरांगे (Manoj Jarange) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. आज ते जालना येथे बोलत होते. यावेळी जरांगे यांनी मोदी यांना टार्गेट केलं.

मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात पण अरबी समुद्रात भूमिपूजन करून शिवरायांचे स्मारक होत नाही, असं म्हणत जरांगे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना टार्गेट केलं. तसंच छत्रपतींचा महानाट्य दाखवलं म्हणजे गुन्हा केला का?, असा सवाल देखील जरांगे (Manoj Jarange) यांनी उपस्थित केला.

जरांगे पाटील यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून पंतप्रधान मोदींना घेरल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले होते. यासाठी नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिल्याने पुण्यात जरांगेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी न्यायालयीन सुनावणीला गैरहजर राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

या अटक वॉरंटवरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टार्गेट केलं आहे. “न्याय, गृह विभाग फडवणीस यांच्याकडे आहे. हा देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला डाव आहे. न्यायाधीश हे फडवणीस यांचे नातेवाईक आहेत. मला जेल मध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते. मी कुठं अडकत नाही, म्हणून हा कट आहे.”, असा दावाच जरांगे पाटील(Manoj Jarange) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

“ईडीचे कित्येक वॉरंट कॅन्सल झाले आहेत आणि त्यामध्ये छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक यांचे नाव आहे. बाकीचे देव बाप्पा चांगले मग हे देव बाप्पा असे कसे?मला वॉरंट आले तरी मी जात नसतो, कोर्टाने पण फडवणीस यांचे ऐकणे सोडावे”, असंही जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी 20 जुलैपासून आमरण उपोषणाला जालन्यातील अंतरवली सराटीत सुरुवात केली होती.आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मात्र, त्यांनी आज उपोषण स्थगित केल्याची घोषणा करत राज्य सरकारला आता 13 ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे.

News Title –  Manoj Jarange Target PM Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या-

“मला जेलमध्ये टाकून जीवे मारले जाऊ शकते”; फडणवीसांचं नाव घेत जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

मनोज जरांगेंच्या आरक्षणाला स्थगिती, सरकारला ‘या’ तारखेपर्यंत दिला वेळ

“माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील”, अजितदादा गटातील आमदाराच्या मुलाचं मोठं वक्तव्य

काळजी घ्या! ‘या’ भागांत पावसाचा जोर वाढणार, रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

“तथाकथित चाणक्य आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतील लायकी…”; रोहित पवारांचा हल्लाबोल

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .