Manoj Jarange | राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षण अत्यंत कळीचा मुद्दा होऊन गेला आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे लढा देत आहेत दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे उपोषणासाठी बसले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या (Laxman Hake) आंदोलनावर मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) टीका केली आहे.
मनोजर जरांगे (Manoj Jarange) यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंवर अत्यंत गंभीर आरोप
भारतात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांची मागणी ते करतात मी माझ्या समाजावर ठाम आहे. ते दिशाभूल करत आहेत. दिशाभूल करायची ती करू द्या. त्यांना आरक्षण संविधानाने दिले आहे. SC ST ला धक्का लागणार नाही त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे.त्याचं आंदोलन सरकार पुरस्कृत आंदोलन आहे, असं जरांगे म्हणालेत.
माझा त्यांच्या आंदोलनाला विरोध नाही. मी त्यांच्यावर उत्तर देणार नाही. मी किती वेळेला पाडा म्हणालो ते सांगा. आम्ही जेवढे दिवस म्हणतो विरोध नाही तर तुम्ही आता जास्त करत आहात, असंही त्यांनी म्हटलंय.
Manoj Jarange | “मराठ्यांच्या पोरांनी जीव देऊ नका”
मी आरक्षण मिळवून देणार आहे. आरक्षण मिळाल्यावर इच्छा पूर्ण होणार. नोकरी हुकली तरी चालेल मात्र तुमचा जीव महत्वाचा आहे. तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही.पुढील दिवसात तुम्हाला आरक्षण असेल. मराठ्यांच्या पोरांनी जीव देऊ नका, असं आवाहन त्यांनी केलंय.
काळजी करू नका. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे. एकाही तरूणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशी विनंती देखील मनोज जरांगेंनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सोनाक्षी सिन्हा मुस्लिम अभिनेत्यासोबत करणार लग्न, भाऊ म्हणाला…
तैमुरसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार; सैफने घेतला मोठा निर्णय
पाणीपुरी खाणं पडलं महागात, जळगावातील 80 जणांना विषबाधा
श्रद्धा कपूर होणार मोदी घराण्याची सून; जाहीरपणे दिली प्रेमाची कबुली?
शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये न आल्यास ‘या’ हेल्पलाईन नंबरवर करा तक्रार!